विद्यार्थ्यांना जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:06 IST2018-01-15T23:06:33+5:302018-01-15T23:06:59+5:30
अहेरी तालुक्यातील राजे धर्मराव अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना जीवे मारण्याची धमकी
आॅनलाईन लोकमत
वेलगूर : अहेरी तालुक्यातील राजे धर्मराव अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
वेलगूर येथील नागरिक अब्दुल शेख याने आश्रमशाळेच्या परिसरात अतिक्रमण करून घर बांधले आहे. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अब्दुल शेख व अन्य दोघाजणांनी नवव्या वर्गात शिकणाºया शिवाजी कांदोला कुºहाड मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर याच शाळेतील शैला महाकाई या विद्यार्थिनीला विहिरीत फेकून देण्याची धमकी दिली. या घटनेमुळे आश्रमशाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबतची तक्रार सोमवारी मुख्याध्यापकांनी अहेरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. मात्र वृत्त लिहिपर्यंत धमकी देणाºयाविरोधात गुन्ह्याची नोंद पोलिसांनी केली नव्हती. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी पालकांनी केली आहे.