शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

'तुफान' धुळीत मिसळला ! झारखंडमध्ये माओवाद्यांना मोठा धक्का; जहाल नेत्यासह १२ जणांचा खात्मा

By संजय तिपाले | Updated: January 22, 2026 16:27 IST

Gadchiroli : झारखंडमधील माओवादी कारवायांचा मास्टर माईंड व केंद्रीय समिती सदस्य अनल उर्फ तुफान, उर्फ पतिराम मांझी याच्यासह १२ माओवाद्यांना ठार करण्यात २२ जानेवारी रोजी सुरक्षा दलाला यश आले.

​लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: झारखंडमधील माओवादी कारवायांचा मास्टर माईंड व केंद्रीय समिती सदस्य अनल उर्फ तुफान, उर्फ पतिराम मांझी याच्यासह १२ माओवाद्यांना ठार करण्यात २२ जानेवारी रोजी सुरक्षा दलाला यश आले. झारखंडमध्ये माओवाद्यांच्या हिंसक कारवाया त्याच्या इशाऱ्यावरच चालत होत्या. त्याच्यावर तब्बल एक कोटीचे इनाम होते. कोब्रा कमांडोंनी सारंडाच्या घनदाट जंगलात त्याला अचूकपणे टिपले, त्यामुळे माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.

अनल उर्फ तुफान, उर्फ पतिराम मांझी हा झारखंडच्या झरहाबाले (जि. गिरीडीह) येथील रहिवासी होता. तो आपल्या साथीदारांसह सारंडाच्या जंगलात मोठी बैठक घेणार असल्याची 'टीप' सुरक्षा दलांना मिळाली होती.   आयजी साकेत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोब्रा २०३, २०५ आणि २०९ च्या जवानांनी जंगलात  सापळा रचला  , यावेळी माओवाद्यांना पळायलाही जागा उरली नाही. घनदाट जंगलात झालेल्या या चकमकीत कोब्रा जवानांनी आपल्या अचूक निशाण्याने नक्षलवाद्यांचे कंबरडेच मोडले.

मोठा शस्त्रसाठा जप्त

घटनास्थळावरून जवानांनी एके-४७ चा मोठा साठा तसेच स्फोटकेही हस्तगत केली आहेत. केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद मुळापासून उपटून फेकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्या लढाईतील झारखंडमधील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

दहशतीचे साम्राज्य उद्धवस्थ !

​जवानांवर हल्ले, खून, स्फाेट,शस्त्रे लुटणे अशा गंभीर स्वरुपाच्या अनेक गुन्ह्यांत 'तुफान'चा सहभाग राहिलेला आहे.तो केवळ हिंसक कारवायांत सहभागी नव्हता, तर तो पोलिसांना चकमा देण्यातही माहीर होता. हत्या,स्फोट आणि शस्त्रे लुटण्यासारख्या शेकडो गुन्ह्यांत तो वॉन्टेड होता. सारंडा आणि गिरिडीहच्या जंगलात त्याचे एकतर्फी साम्राज्य होते. मात्र, जवानांच्या शौर्यापुढे त्याच्या दहशतीचा अंत झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Major Blow to Maoists: Top Leader 'Tufan' Among 12 Killed

Web Summary : Security forces in Jharkhand eliminated Maoist mastermind 'Tufan' and 11 others in Saranda forest. 'Tufan,' a central committee member, had a reward of ₹1 crore on his head. The operation yielded a large cache of weapons and explosives, marking a significant step in eradicating Naxalism by 2026.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर