शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला मिळाले ४८ ‘चालक कम वाहक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

गडचिरोली विभागाअंतर्गत गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी हे तीन आगार आहेत. या तीनही आगारांमध्ये वाहक व चालकांची सुमारे २१३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत होता. काही कर्मचाºयांना ओव्हर टाईम काम करण्याची जबाबदारी पेलावी लागत होती. तर कधी-कधी वाहक व चालकांअभावी बसफेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. दोन महिन्यांपूर्वी गडचिरोली विभागाने ६१ चालक कम वाहकांची नियुक्ती केली होती.

ठळक मुद्देसेवेत दाखल : फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण होणार कमी; गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी आगारात नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एसटी महामंडळाकडून ४८ दिवसांचे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४८ ‘चालक कम वाहक’ यांना गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी आगारात नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांअभावी बसफेऱ्या रद्द होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गडचिरोली विभागाअंतर्गत गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी हे तीन आगार आहेत. या तीनही आगारांमध्ये वाहक व चालकांची सुमारे २१३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत होता. काही कर्मचाºयांना ओव्हर टाईम काम करण्याची जबाबदारी पेलावी लागत होती. तर कधी-कधी वाहक व चालकांअभावी बसफेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. दोन महिन्यांपूर्वी गडचिरोली विभागाने ६१ चालक कम वाहकांची नियुक्ती केली होती. तीन वर्ष वाहन चालविण्याचा अनुभव असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना ४८ दिवसांचे तर तीन वर्षांपेक्षा कमी अनुभव असलेल्यांना ८० दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. ४८ दिवसांच्या प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना आगारांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. गडचिरोली आगाराला २१, अहेरी आगाराला १९ तर ब्रह्मपुरी आगाराला ८ चालक कम वाहकांची नियुक्ती देण्यात आली आहे.नव्याने रूजू होणाºया चालक कम वाहकांना वाहन चालविण्याबरोबरच वाहकाचे काम कसे करावे, याबाबतचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्याचा उपयोग गरजेनुसार करता येणार आहे. वाहकाची आवश्यकता असेल तर वाहक म्हणून नियुक्ती दिली जाईल. चालकाची आवश्यकता असेल तर चालक म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे.गडचिरोली आगारात एकूण १११ बसेस आहेत. १८१ चालक व १८९ वाहक आहेत. बसफेऱ्यांच्या तुलनेत चालक व वाहकांची संख्या कमी असल्याने अनेकवेळा बसफेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. गडचिरोली आगाराला नवीन २१ चालक कम वाहक मिळाल्याने थोडीफार समस्या दूर होणार आहे.गडचिरोली आगारात दोन नवीन बसेस दाखलगडचिरोली आगाराला मागील महिन्यात दोन नवीन बसेस मिळाल्या होत्या. त्यानंतर आता जानेवारी महिन्यात पुन्हा दोन नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत. सदर बसेस विठाई या नावाच्या आहेत. या बसेसची आसन क्षमता ४४ सिटर एवढी आहे. डीएस प्रकारचे इंजिन, एमएस बॉडी आहे. आरमदायक सिटा आहेत. साध्या तिकीट दराने या बसेस चालविल्या जाणार आहेत. गडचिरोली-उमरखेड या लांब पल्ल्यावर या बसेस सोडल्या जातील.

टॅग्स :state transportएसटी