शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय रस्त्यांमुळे एसटी बसचा प्रवास झाला खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण आहे. या भागात खासगी प्रवासाची वाहने अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे या मार्गावर एसटीची वाहने चालवावीच लागतात. मात्र जिल्ह्यातील काही मार्गांची माेठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. माेठमाेठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची संख्यासुद्धा अधिक आहे. एसटी हे तुलनेने माेठे वाहन आहे. त्यामुळे खड्डा चुकविणे कठीण हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील प्रमुख मार्गांबराेबरच इतरही काही मार्ग अतिशय खराब झाले आहेत. सामाजिक दृष्टिकाेन लक्षात घेऊन या मार्गांवर एसटीच्या फेऱ्या चालवाव्या लागत आहेत. मात्र या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांचे चांगलेच हाल हाेत आहेत. तसेच एसटीचेही नुकसान हाेत आहे.गडचिराेली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण आहे. या भागात खासगी प्रवासाची वाहने अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे या मार्गावर एसटीची वाहने चालवावीच लागतात. मात्र जिल्ह्यातील काही मार्गांची माेठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. माेठमाेठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची संख्यासुद्धा अधिक आहे. एसटी हे तुलनेने माेठे वाहन आहे. त्यामुळे खड्डा चुकविणे कठीण हाेते. तरीही नागरिकांची अडचण लक्षात घेऊन एसटी बसेस साेडाव्या लागत आहेत. पावसाळ्यात डांबरी मार्गांची दुरुस्ती करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे पुन्हा तीन महिने अशाच पद्धतीच्या मार्गांवरून वाहने चालविल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 

आलापल्ली-सिराेंचा मार्ग सर्वांत खराबआलापल्ली-सिराेंचा हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घाेषित करण्यात आला आहे. मात्र या मार्गाची मागील दाेन वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली नाही. आता या मार्गावर माेठमाेठे खड्डे पडले आहेत. दाेन तासांचा प्रवास तीन ते चार तास करावा लागत आहे. या मार्गामुळे प्रवासीसुद्धा त्रस्त झाले आहेत. 

मार्ग वळविणे शक्य नाही- गडचिराेली जिल्ह्याचा विस्तार उत्तर-दक्षिण सर्वाधिक आहे, तर पूर्व-पश्चिमेचा विस्तार अतिशय कमी आहे. काेरची ते सिराेंचा हा प्रमुख मार्ग आहे. या एकाच मार्गाने बहुतांश तालुके जाेडण्यात आले आहेत. त्यामुळे एखादा मार्ग खराब असला तर दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळविणे शक्य नाही. तसेच गडचिराेली-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे.  त्यामुळे या मार्गाचीही दुर्दशा झाली आहे.

एसटीचा खर्च वाढलामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन कमी वेगाने चालवावे लागते. एका खड्ड्यातून एसटी बस दुसऱ्या खड्ड्यात जाते. सततच्या आदळआपटीमुळे एसटीचे टायर लवकरच खराब हाेत आहेत. तसेच खिडक्यांच्या काचा फुटणे, बेअरिंग खराब हाेणे, नटबाेल्ट ढिले हाेणे यांसारखे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे एसटीच्या देखभालीचा खर्च वाढत चालला आहे. कमी वेगाने वाहन चालवावे लागत असल्यामुळे डिझेलचाही खर्च वाढला आहे.

 

टॅग्स :state transportएसटी