शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

धानाेरातील आयटीआयची प्रशस्त इमारत अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST

घनश्याम मशाखेत्री धानाेरा : सुमारे दीड काेटी रुपये खर्चून धानाेरा येथे प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. १३ ऑगस्ट २०१९ ...

घनश्याम मशाखेत्री

धानाेरा : सुमारे दीड काेटी रुपये खर्चून धानाेरा येथे प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. १३ ऑगस्ट २०१९ राेजी बांडिया नदीच्या पुराचे पाणी या इमारतीत पावसाचे पाणी शिरले हाेते. त्यामुळे इमारतीमधील वीज उपकरणांचे नुकसान झाले. तेव्हापासून या ठिकाणचा वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

युवकांना व्यवसायाचे प्रशिक्षण देता यावे यासाठी प्रत्येक तालुक्यात आयटीआयची निर्मिती करण्यात आली आहे. सुरुवातीच्या कालावधीत येथील आयटीआय भाड्याच्या खाेलीत भरविली जात हाेती. कालांतराने गडचिराेली मार्गावर राधेश्यामबाबा मंदिराजवळ सर्व सुविधांनीयुक्त प्रशस्त इमारत बांधण्यात आली. सन २०११ पासून या ठिकाणी प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात झाली. इलेक्ट्राॅनिक्स, पेंटर, प्लंबर, डिझेल मेकॅनिक, कटिंग, ड्रेस मेकिंग हे सहा ट्रेड शिकविले जातात. वसतिगृहात २५ प्रशिक्षणार्थ्यांच्या राहण्याची साेय आहे. सर्व सुरळीत सुरू असताना १३ ऑगस्ट २०१९ रोजी बांडिया नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरले. या पाण्यामुळे आयटीआयचा रस्ता, बाहेर उभे असलेले प्रशिक्षणाचे वाहन, सुरक्षाभिंत, स्ट्रीट लाइटचे खांब, शासकीय दस्ताऐवज व इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच विद्युतचे फिटिंग पूर्ण जळाली. वीजमीटर बोर्ड खराब झाले. तेव्हापासून येथील वीज आजतागायत दीड वर्ष लोटूनही बंद आहे. कोरोना काळात प्रशिक्षण बंद होते १ जानेवारीपासून प्रशिक्षण सुरू झाले आहे.परंतु लाइट नसल्याने वर्कशॉपमधील बंद आहेत. त्यांच्या कृतीयुक्त शिक्षणाला आळा बसत आहे. वर्गात शिकवताना विद्यार्थी व शिक्षकांना त्रास होत आहे. वीजपुरवठा तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.

बाॅक्स

उन्हाळ्यात प्रशिक्षण घेणे हाेणार कठीण

आयटीआयचे प्रशिक्षण उन्हाळ्यातही सुरू राहते. मात्र वीजपुरवठा बंद असल्याने या ठिकाणी राहणे कठीण हाेणार आहे. तसेच वसतिगृहातही लाइट नसल्याने विद्यार्थ्यांना तेथे राहता येत नाही. त्यामुळे त्यांना धानोरा येथे भाड्याची खाेली करून राहावे लागत असल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे.

काेट

आयटीआयमधील विद्युत दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून डीपीसीकडे मंजुरीसाठी पाठविले आहे, ते मंजूर होताच निविदा काढून दुरुस्तीचे काम केले जाईल.

-एल. सी. हेरोडे, अभियंता (इले.) बांधकाम विभाग, गडचिरोली

काेट

याबाबत बांधकाम विभाग गडचिरोली यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला आहे, परंतु अजूनही विद्युत दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्यांना व शिक्षकांना त्रास होत आहे.

- एस. एस चौधरी, प्रिन्सीपल आयटीआय, धानोरा