शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रूग्णालयात अत्याधुनिक सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:27 IST

इंदिरा गांधी चौकातील १०० खाट क्षमता असलेल्या महिला व बाल रूग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा राहणार आहेत. महिला रूग्णालयात सेंट्रल क्लिनिकल लेबॉरटरी असणार आहे. अशा प्रकारची लेबॉरटरी असलेले राज्यातील पहिलेच रूग्णालय आहे.

ठळक मुद्देमहिला रूग्णालयात सेंट्रल क्लिनिकल लेबॉरटरी असलेले राज्यातील पहिलेच रूग्णालय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : इंदिरा गांधी चौकातील १०० खाट क्षमता असलेल्या महिला व बाल रूग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा राहणार आहेत.महिला रूग्णालयात सेंट्रल क्लिनिकल लेबॉरटरी असणार आहे. अशा प्रकारची लेबॉरटरी असलेले राज्यातील पहिलेच रूग्णालय आहे. या ठिकाणी महिलांच्या गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करता येईल, असे काल्पोस्कोपी हे यंत्र बसविण्यात आले आहे. त्याचबरोबर सिव्हेज ट्रिटमेंट प्लान्ट, सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा असल्याने एक प्रकारची हे पर्यावरण अनुकूल ग्रीन हॉस्पीटल ठरले आहे. ५ डिसेंबर २०१० रोजी तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते इमारतीचे भूमीपूजन झाले.इमारतीचे बांधकाम एकूण ८४७१.९८ चौरस मीटर क्षेत्रात असून यासाठी १८ कोटी ७७ लाख ९ हजार रूपये एवढा खर्च आला आहे. या रूग्णालयात एकूण ६६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५७ पदे भरली आहेत. यामध्ये एक स्त्री रोग व प्रसुतीतज्ज्ञ, दोन बधिरीकरण तज्ज्ञ, दोन बाल रोगतज्ज्ञ व एक क्ष-किरण तज्ज्ञ राहणार आहेत. इतर आठ वैद्यकीय अधिकारी राहतील. वर्ग ३ ची पाच व वर्ग ४ ची २४ पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात येतील.नियोजन विभागासाठी प्रशस्त इमारतजिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नियोजन भवन बांधण्यात आली आहे. इमारत उभारणीसाठी ६ कोटी ६५ लाख २६ हजार रूपये खर्च आला आहे. इमारत दोन मजली असून एकूण ११२८.६९ चौरस मीटरमध्ये बांधकाम आहे. पहिल्या मजल्यावर अध्यावत असे १५० आसन क्षमतेचे सभागृह आहे. संपूर्ण सभागृह साऊंडप्रुफ असून त्यात तीन प्रोजेक्टर आहेत. पहिल्या मजल्यावर व्हीआयपी कक्ष, नियोजन अधिकारी यांचे कक्ष आहे. मुख्य इमारतीचे बांधकाम १५ महिन्यात पूर्ण झाले. सजवाटीसाठी १ कोटी ७६ लाखांचा खर्च झाला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल