शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातून ‘जय विदर्भ’चा नारा गुंजणार

By admin | Updated: November 13, 2014 23:01 IST

महाराष्ट्रात सर्वात मागास व विकासातही सर्वात मागे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला आता स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. राज्यातील भाजपच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली

ए. आर. खान - अहेरीमहाराष्ट्रात सर्वात मागास व विकासातही सर्वात मागे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला आता स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. राज्यातील भाजपच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली नसल्याने दुर्गम भागातील जनतेसह जिल्ह्यातील विदर्भवादी नेत्यांना आता स्वतंत्र विदर्भ राज्य होईल, अशी मोठी आशा वाटू लागली आहे. त्यामुळेच आगामी नागपूर अधिवेशनाच्या काळात अहेरी उपविभागातून पुन्हा जय विदर्भाचा नारा गुंजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले. या भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या भरवशावर हा भाग समृद्ध होऊ शकला असता, परंतु राज्य सरकारची उदासीनता याला कारणीभूत ठरली. पश्चिम महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी कायम विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यावरही अन्याय करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे नक्षलवादासारख्या गंभीर प्रश्न या भागात वाढीस लागला. सिंचनाची कोणतीही सुविधा निर्माण झाली नाही. ज्या जनतेने जंगल राखला, तोच जंगल विकासासाठी अडसर ठरला. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय आपला विकास शक्य नाही, ही भावना आता गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. या भावनेतूनच गडचिरोलीसह विदर्भातून भारतीय जनता पक्षाला ४४ जागा निवडणुकीत विधानसभेत मिळाल्या. भारतीय जनता पक्षाचा मागील २५ वर्षांपासून मित्र असलेला शिवसेना विदर्भ राज्याचा कायम विरोधक राहिला. मात्र बुधवारी झालेल्या विश्वास मत प्रस्तावानंतर शिवसेनेशी असलेले नाते पूर्णपणे संपुष्टात आले. आता भाजपला विदर्भ राज्य देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका विदर्भ राज्याबाबत अनुकूल नसली तरी पक्षातील विदर्भवादी नेते मात्र स्वतंत्र राज्यासाठी कंबर कसून आहे. नाग विदर्भ आंदोलन समितीनेही भाजपसोबत याच मागणीला घेऊन आघाडी केली आहे. स्वत: नाविसचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज भाजपचे आमदार आहे. त्यामुळे आगामी नागपूर अधिवेशनाच्या काळात पुन्हा स्वतंत्र विदर्भाचा नारा गडचिरोली जिल्ह्यात गुंजणार आहे, असे चित्र दिसून येत आहे.