शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा विद्युत अभियंत्याला घेराव

By admin | Updated: July 1, 2015 01:58 IST

तालुक्यातील सोनेरांगी, वाशी व उराडी परिसरातील गांवाचा विद्यूत पुरवठा मागील १२ दिवसांपासून बंद असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी शिवसेनेचे

नवीन रोहित्र बसविण्याचे आश्वासन : सोनेरांगी, वाशी व उराडी येथील वीज पुरवठा आहे बंदकुरखेडा : तालुक्यातील सोनेरांगी, वाशी व उराडी परिसरातील गांवाचा विद्यूत पुरवठा मागील १२ दिवसांपासून बंद असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात विद्यूत उपअभियंता शेडमाके यांना सोमवारी घेराव घातला व वीज पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी केली.यावेळी उपअभियंता शेडमाके यांनी आंदोलकांशी चर्चा करतांना सांगितले की, सोनेरांगी, वाशी व उराडी परिसरातील विद्यूत मधील बिघाड शोधून तो दुरूस्त केला जाईल असे आश्वासन दिले. खापरी येथील विद्यूज रोहित्र जळाला असून त्या ठिकाणी नवीन रोहित्र लावले जाणार आहे. कुरखेडा तालुक्यात यावर्षी नवीन १६ रोहित्र बसविले जाणार आहेत व ७५ नवीन रोहित्र बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो गडचिरोली येथील वीज कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रत्येक गावात स्वतंत्र सर्किट व रोहित्र बसविले जाणार आहे. अशी माहिती दिली. एक तास चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महेंद्र मोहबंसी, जिल्हा परिषद सदस्य अशोक इंदुरकर, शिवसेना उपतालुका प्रमुख लोमेश कोटांगले, नरेंद्र तिरणकर, सोनेरांगीच्या सरपंच निता घोडाम, दिगांबर मानकर, उपसरपंच बाबूराव कुमरे, तंटामुक्ती अध्यक्ष टिकाराम मांदाळे, गुरुदेव निकोडे, घनश्याम घोडाम, जगदीश कोहळे, नेताजी हजारे, सुरेश रणदिवे, विकास नारनवरे, रोषण निमजे, डॉ. अनिल उईके आदी मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)