शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रेत्यांवरील कारवाया थंडावल्या

By admin | Updated: September 10, 2016 01:13 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्रीविरोधात कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती.

पोलीस अधीक्षकांच्या आवाहनानंतरही : विक्रेत्यांचे धंदे सुरूचगडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्रीविरोधात कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. मात्र मागील सहा महिन्यांपासून अवैध दारू विक्रेत्यांविरोधात शहरी भागात पोलिसांची कारवाई पूर्णपणे ठप्प झाल्याने अनेक तालुका मुख्यालयात भ्रमणध्वनीवरूनही संपर्क केल्यावर सहजपणे दारू उपलब्ध होत असल्याचे प्रकार सुरू झाले आहे. त्यामुळे महिलांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली असून पोलीस यंत्रणा व उत्पादन शुल्क विभाग याबाबत काहीच करीत नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूच्या व्यवसायात १० हजारावरील अधिक लोक सहभागी झाले आहेत. तरूण मुलापासून आबाल वृध्दांपर्यंत नागरिक अवैधरित्या दारू विक्री करीत आहे. परप्रांतातून दररोज मोठ्या प्रमाणावर दारूची वाहतूक होते. जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दिमध्ये दारू विक्री होत आहे. नव्याने रूजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अवैध दारू विक्रेत्यांचे नावे कळवावे, यासाठी दोन अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली होती. मात्र त्यानंतरही अवैध दारू विक्री बंद झाली नाही. चामोर्शी येथून संपूर्ण जिल्ह्याच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणावर दारूचा पुरवठा केला जातो. ज्या दारू विक्रेत्यांवर पाच पेक्षा अधिक गुन्हे दारूच्या संदर्भात आहे. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी महिला संघटनांनी केली होती. मात्र यावरही गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सवाच्या काळात कारवाई होईल, अशी आशा होती. परंतु अशी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे दारू विक्रेते राजरोसपणे गावागावात दारूचा पुरवठा करीत आहे. उत्सवाचा काळ असून सुध्दा मुबलक प्रमाणात दारू जिल्ह्यात विकली जात आहे. उत्पादन शुल्क विभाग गडचिरोली जिल्ह्यात कारवाया करीत नसल्याचे चित्र मागील दीड वर्षांपासून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)