सात फुटांचा अजगर आढळला

By Admin | Updated: September 4, 2016 01:58 IST2016-09-04T01:58:31+5:302016-09-04T01:58:31+5:30

येथील मुस्लीम टोल्यात सलमान खान रफीक खान पठाण यांच्या राहत्या घरी सुमारे सात फूट लांबीचा अजगर आढळून आला.

A seven-foot python was found | सात फुटांचा अजगर आढळला

सात फुटांचा अजगर आढळला

भामरागडातील घटना : पाहण्यासाठी नागरिकांची उसळली गर्दी
भामरागड : येथील मुस्लीम टोल्यात सलमान खान रफीक खान पठाण यांच्या राहत्या घरी सुमारे सात फूट लांबीचा अजगर आढळून आला. सर्पमित्रांनी त्याला पकडून जंगलात सोडले.
जंगल मार्गे सदर साप भामरागड शहरात आला. सलमान खान रफीक खान पठाण यांच्या घराजवळच्या परिसरातील तीन बदकांना ठार करून गिळले. त्यानंतर अजगाराने सलमान खान रफीक खान पठाण यांच्या घरात प्रवेश केला. एवढा मोठा साप बघून पठाण कुटुंबिय धास्तावून गेले. याबाबतची माहिती सर्पमित्र अजहर शेख याला बोलाविण्यात आले. त्याने सदर सापाला पकडले. अजगर सापडल्याची माहिती भामरागड येथे वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सदर सापाला पाहणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. सदर साप हेमलकसा येथील प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. भामरागड तालुक्यात अजगर साप आढळून येतात. जंगलमार्गे हे साप गावामध्ये प्रवेश करतात. आजपर्यंत आढळलेल्या सापांमध्ये भामरागड येथे शनिवारी आढळलेला साप सर्वात मोठा आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे. सर्पमित्र अजहर शेख यांना वेळीच बोलविल्याने अजगाराचे प्राण वाचण्यास फार मोठी मदत झाली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: A seven-foot python was found