वन्यप्राण्याची शिकार करून मांसविक्री करणाऱ्या सात आराेपींना अटक
By गेापाल लाजुरकर | Updated: September 27, 2025 19:43 IST2025-09-27T19:42:37+5:302025-09-27T19:43:29+5:30
हिस्से करण्याचा प्रयत्न फसला : लांगटाेला येथे वन विभागाची कारवाई

Seven accused arrested for hunting wild animals and selling meat
गडचिराेली : वन्य प्राण्याची शिकार करून गावातील शेवटच्या घरी आपसातील लाेकांनाच मांस विक्री करण्यासाठी हिस्से करीत असतानाच धानाेरा (दक्षिण) वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी धाड टाकून सात जणांच्या टाेळीला रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवार, २६ सप्टेंबर राेजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धानाेरा तालुक्याच्या लांगटाेला येथे करण्यात आली. याप्रकरणी सात आराेपींना अटक केली आहे.
किरपालसिंग भगतसिंग डांगी, रा. पेटतुकुम, ता. आरमोरी, विलास वासुदेव उईके रा. लांगटोला, किशोर बाबूराव हलामी, महेश भीमराव पावे, प्रकाश आनंदराव वाघाडे, रमेश रामसिंग मडावी रा. धानोरा, सुनील ऋषी गावडे, रा. पवनी अशी अटक झालेल्या आराेपींची नावे आहेत. सातही आरोपींची चाैकशी करुन मोका पंचनामा करण्यात आला. त्यानुसार भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) (आय) व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ कलम ९, ३९, ४४, ४८, ५१, ५७ महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे कलम ९ ब,क,इ अन्वये गुन्हा नाेंदविण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक वनसंरक्षक अंबरलाल काशिराम मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार, क्षेत्रसहायक गांगरेड्डीवार, हितेश मडावी, मिलिंद कोडाप, सीमा सिडाम, लीना गेडाम, भूमा सय्याम, किरण रामटेके करीत आहेत.
शिकार कुठे झाली, प्राणी काेणता?
आराेपींनी वन्य प्राण्याची शिकार कुठे केली, याबाबत वन विभागाने अद्यापही स्पष्ट केले नाही. शिवाय शिकार झालेला प्राणी नेमका काेणता याबाबतही सांगितले नाही. मात्र सदर प्राणी चितळ, हरीण किंवा सांबर असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.