लखमापूर बोरी येथे कोविड लसीकरण केंद्र उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:27 AM2021-04-29T04:27:58+5:302021-04-29T04:27:58+5:30

चामोर्शी : लखमापूर बोरी हे जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेले तालुक्यातील मोठे गाव असल्याने दिनांक १ मेपासून राज्य ...

Set up Kovid Vaccination Center at Lakhmapur Bori | लखमापूर बोरी येथे कोविड लसीकरण केंद्र उभारा

लखमापूर बोरी येथे कोविड लसीकरण केंद्र उभारा

Next

चामोर्शी : लखमापूर बोरी हे जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेले तालुक्यातील मोठे गाव असल्याने दिनांक १ मेपासून राज्य शासनाद्वारे १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना केल्या जाणाऱ्या कोविड लसीकरणासाठी गावातच लसीकरण केंद्र उभारावे, अशी मागणी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच सर्व ग्रामस्थांनी केली आहे.

४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी जे लसीकरण सुरु आहे त्याचे लसीकरण केंद्र ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणीच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी बोरीवासीयांना एकतर भेंडाळा किंवा चामोर्शी याठिकाणी १० किलोमीटर अंतरावरील केंद्रावर जावून लस घेण्याशिवाय पर्याय नव्हता. ही लस घेण्यासाठी अनेक वृद्धांना पायपीट व वेळ, पैसा खर्च करून केंद्रावर जावे लागले होते. या त्रासामुळेच गावातील ४५ वर्षांवरील अनेक व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहिल्या होत्या. आता दिनांक १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच मोफत लस दिली जाणार आहे. गावातील लसीकरणासाठी पात्र असणाऱ्यांची संख्या साहजिकच अधिक असणार आहे. मागील लसीकरणावेळी आलेला अनुभव पाहता, या लसीकरणावेळीही अनेक व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यावर उपाय म्हणून गावातच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवनिर्मित इमारतीत ज्याची ९० टक्के बांधणी पूर्ण झाली आहे किंवा जिल्हा परिषद शाळा अथवा भगवंतराव हायस्कूलच्या इमारतीत लसीकरण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बाॅक्स

ग्रामपंचायत पुरविणार सुविधा

या लसीकरण केंद्रासाठी वीज, पंखे, कुलर्स, पिण्याच्या पाण्याची सोय, लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून राहण्यायोग्य प्रशस्त जागा, लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सोय उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीतर्फे करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

Web Title: Set up Kovid Vaccination Center at Lakhmapur Bori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.