शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांनाे, ओमायक्राॅन राेखायचा तर बुस्टर साेडा, आधी पहिला डाेस घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

काेराेनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्राॅन या विषाणूने जगात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भारत सरकार सतर्क झाले आहे. ज्येष्ठांना या विषाणूपासून धाेका हाेऊ नये, यासाठी बुस्टर डाेस देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक काेराेना प्रतिबंधात्मक लस घेण्यास अतिशय मागे असल्याचे दिसून येते. काेराेनाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ३ जानेवारीपासून ज्येष्ठांना बुस्टर डाेस दिला जाणार आहे. याची तयारी आराेग्य विभागाने केली आहे. मात्र, काही ज्येष्ठ नागरिकांनी अजूनपर्यंत पहिलाच डाेस घेतला नाही. त्यांचे काय करायचे, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. ज्येष्ठांनी पहिला व दुसरा डाेस नियमित वेळेत घेण्याची गरज आहे. काेराेनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्राॅन या विषाणूने जगात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भारत सरकार सतर्क झाले आहे. ज्येष्ठांना या विषाणूपासून धाेका हाेऊ नये, यासाठी बुस्टर डाेस देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक काेराेना प्रतिबंधात्मक लस घेण्यास अतिशय मागे असल्याचे दिसून येते. काेराेनाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. 

वाहनांमुळे लसीकरणाची गती वाढली

प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना लस देण्यासाठी आराेग्य विभागाला शासनाने वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनांच्या मदतीने आराेग्य कर्मचारी प्रत्येक गावी, तसेच घराची भेट घेऊन लसीकरण करीत आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती वाढली आहे. मात्र दुर्गम भागात अजुनही काही नागरिक लस घेण्यास तयार नाही.

७० हजार ज्येष्ठांना बुस्टर डाेसज्यांनी दाेन्ही डाेस घेतले आहेत, त्यांनाच बुस्टर डाेस दिला जाणार आहे. गडचिराेली जिल्ह्यात सद्यस्थितीत ९८ हजार ज्येष्ठांनी पहिला डाेस व ६८ हजार ज्येष्ठांनी दुसरा डाेस घेतला आहे. म्हणजे ६८ हजार ज्येष्ठांना बुस्टर डाेस मिळेल. ही आकडेवारी वाढू शकते. 

१० हजार हेल्थ वर्करलाही मिळेल बुस्टरगडचिराेली जिल्ह्यात जवळपास १० हजार आराेग्य कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना सुद्धा बुस्टर डाेस दिला जाणार आहे. काेराेनाचा सर्वाधिक धाेका आराेग्य कर्मचाऱ्यांना राहत असल्याने त्यांना बुस्टर डाेस दिला जाणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

मुलांनाही मिळणार डाेस-    १५ ते १८ वर्षे वयाेगटातील मुलांना सुद्धा काेराेना लस दिली जाणार आहे. १ जानेवारीपासून काेविड ॲपवर नाव नाेंदणी करता येणार आहे. या वयाेगटातील मुलांना ३ जानेवारीपासून लस दिली जाणार आहे.

आतापर्यंत दिल्या १० लाख ९७ हजार लस-   आतापर्यंत जिल्ह्यात पहिली व दुसरी लस मिळून १० लाख ९७ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. ६ लाख ७५ हजार ६९७ नागरिकांना पहिला डाेस तर ४ लाख २१ हजार २३० नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला आहे. तालुकास्थळ व जवळच्या गावातील बहुतांश नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र दुर्गम भागातील नागरिकांनी अजुनही पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉन