Senior Congress leader Kishore Vanmali passes away in Gadchiroli district | गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर वनमाळी यांचे निधन

गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर वनमाळी यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील कॉंग्रेस चे  ज्येष्ठ नेते, आरमोरी येथील मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. किशोर वनमाळी यांचे सोमवारी सकाळी ह्रदय विकारांच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते 59 वर्षांचे होते..
किशोर वनमाळी हे सुरवातीपासूनच काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. वडील स्वर्गीय वामनराव वनमाळी याच्या संस्कारात वाढलेल्या किशोर वनमाळी यांनी काँग्रेस पक्षासह मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या काळातच मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाने विविध विद्या शाखा व अभ्यासक्रम सुरू केले. आज ही जिल्ह्यातील मोठी शिक्षण संस्था म्हणुन नावारुपास आली आहे.
किशोर वनमाळी यांचा अनेक सामाजिक धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रांशी सबंध होता. त्यांचा अचानक निधनाने आरमोरीसह जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Senior Congress leader Kishore Vanmali passes away in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.