शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
2
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
3
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
6
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
7
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
8
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
9
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
10
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
11
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
12
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
13
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
14
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
15
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
16
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
19
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
20
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे घ्यायचे की, मोबाईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

जिल्ह्यात सध्या खरिपाची कामे जोमाने सुरु आहेत. पेरणी योग्य पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी कामाला लागले आहे. तर दुसरीकडे ऑनलाईन शिक्षणावर भर दिल्या जात असल्याने विद्यार्थी पालकांकडे मोबाईल घेऊन देण्यासंदर्भात मागणी करीत आहेत. या मागणीमुळे मात्र पालकांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी पडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना चिंता : आॅनलाईन शिक्षणाला ग्रामीण विद्यार्थी मूकणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शाळा सुरू होण्यासंदर्भात शासनस्तरावर अद्यापही ठोस निर्णय झाला नाही. असे असले तरी काही शाळांनी ऑनलाईन शिकवणी सुरु केली आहे. शहरी भागातील बहुतांश विद्यार्थी या माध्यमातून शिक्षण घेत असले तरी, ग्रामीण भागात सध्या पेरणीची वेळ असल्याने अ‍ॅन्ड्राईड मोबाईल घ्यायचा की, बियाणे असा प्रश्न सध्या शेतकरी कुटुंब विचारत आहे.
जिल्ह्यात सध्या खरिपाची कामे जोमाने सुरु आहेत. पेरणी योग्य पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी कामाला लागले आहे. तर दुसरीकडे ऑनलाईन शिक्षणावर भर दिल्या जात असल्याने विद्यार्थी पालकांकडे मोबाईल घेऊन देण्यासंदर्भात मागणी करीत आहेत. या मागणीमुळे मात्र पालकांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी पडली आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे यावर्षी प्रथमच परीक्षा न घेता निकाल घोषित करण्यात आला. दरवर्षी २६ जूनला शाळेची घंटा वाजायची. यावर्षी मात्र ती कधी वाजणार यासंदर्भात अद्यापही शासनस्तरावर निर्णय झाला नाही. आता काही शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नाही, अशा विद्यार्थ्यांना मात्र अभ्यास कसा करायचा असा प्रश्न पडला आहे.

शासनाने विद्यार्थ्यांना मोबाईल, टॅब द्यावा
शहरातील बहुतांश इंग्रजी शाळा संचालकांनी ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर दिला आहे. परंतु बºयाच पालकांकडे मोबाईल नाही. यातच अ‍ॅन्ड्राईड मोबाईल घ्यावा तरी कसा, असा प्रश्न पालकांना पडला आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात पाहिजे तसे नेटवर्क मिळत नाही आणि मिळाले तरी डाटा रिचार्जकरिता पैसे लागतात. त्यामुळे शासनाने एकतर मोबाईल किंवा टॅब मोफत द्यावे किंवा ऑफलाईन शिक्षण द्यावेत, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. दुसरीकडे कोरोनामुळे बहुतांश पालकांचा रोजगार गेला. त्यामुळे काही पालकांनी गावाला जाणे पसंत केले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्याचे शासन नियोजन करीत आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना अ‍ॅन्ड्राईल मोबार्ईल किंवा मुंबईतील शाळांच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना टॅब देऊन विद्यार्थ्यांची अडचण सोडवावी तसेच पालकांचा ताप काही प्रमाणात कमी करावा, अशी मागणीही आता केली जात आहे.

ग्रामीण भागात वर्क फ्राम होमचा फज्जा
लॉकडाऊमुळे शहरीभागातील बहुतांश नोकरदार गावाकडे परत आले आहे. तर दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांच्याकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल आहे. मात्र नेटवर्क सुविधा नसल्याने त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता शेतीची कामे असल्यामुळे पूर्णवेळ शेतात राबावे लागते, अनेकवेळा शेतकरी आपल्या मुलाबाळांनाही शेतात नेतात. त्यामुळे सध्यातरी ग्रामीण भागातील विद्यार्थी आॅनलाईन शिक्षणाकडे वळणार नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरी भागात जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे हित जपण्याची मागणीही केली जात आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडण्याची भिती
आॅनलाईन शिकविण्यासंदर्भात आता प्रशासकीय स्तरावरूनही विचार केला जात आहे. मात्र ग्रामीण भागातील स्थिती बघता, यामध्ये ते विद्यार्थी पुन्हा मागे पडतील, असे मत शिक्षकतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नाही. त्यातच ज्यांच्याकडे मोबाईल आहे तिथे काही ठिकाणी नेटवर्कचा प्राब्लेम असल्यामुळे ग्रामीण विद्यार्थी येथे मागे पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अन्यवेळी छोटे-मोठे प्रशिक्षण देऊन शिक्षकांना अपडेट ठेवणारा शिक्षण विभाग यासंदर्भात अद्यापतरी बोलण्यास तयार नाही.

टॅग्स :Educationशिक्षण