दुय्यम अभियंता एसीबीच्या जाळ्यात

By Admin | Updated: May 17, 2014 00:15 IST2014-05-17T00:15:37+5:302014-05-17T00:15:37+5:30

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कोरची येथील दुय्यम अभियंता सुनिल रामराव चौरे यांना २ हजार रूपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले.

Secondary engineer ACB net | दुय्यम अभियंता एसीबीच्या जाळ्यात

दुय्यम अभियंता एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कोरची येथील दुय्यम अभियंता सुनिल रामराव चौरे यांना २ हजार रूपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले.

वीज वितरण कंपनी कार्यालय कोरची येथील दुय्यम अभियंता सुनिल रामराव चौरे यांनी राकेश लक्ष्मणराव पारटवार, कंत्राटदार (इलेक्ट्रीक) रा. बेडगाव ता. कोरची यांच्याकडून पंचायत समिती कोरची अंतर्गत कोरची येथील चार अंगणवाडी इमारतीच्या इलेक्ट्रीक मीटरचे डिमांड तयार करून देण्याच्या कामाकरिता २ हजार रूपयाची लाच मागीतली. राकेश पारटवार यांनी दुय्यम अभियंता सुनिल चौरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सुनिल चौरे यांना २ हजार रूपयाची लाच घेतांना पंच व साक्षदांरासमक्ष रंगेहात पकडले. शासकीय योजनेंतर्गत कोरची तालुक्यातील अंगणवाडी इमारतीस इलेक्ट्रीक फिटींग व इलेक्ट्रीक मीटर लावून देण्याचे काम राकेश पारटवार यांना मिळाले होते. पारटवार यांनी तालुक्यातील सात अंगणवाडी इमारतीची इलेक्ट्रीक फिटींग करून दोन अंगणवाडी इमारतीस इलेक्ट्रीक मीटर लावले होते. उर्वरीत चार अंगणवाडी इमारतीस मीटरच्या कामाकरिता चौरे यांनी लाच मागीतली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. आरोपी सुनिल चौरे यांच्या विरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलम ७, १३ (१) (ड) सह १३ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विरोधात कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक रोशन यादव, पोलीस निरीक्षक डी. डब्ल्यू. मंडलवार, पोलीस हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, पोलीस नाईक रवींद्र कत्रोजवार, वसंत जौजाळकर, परिमल बाला, नरेश आलाम, उमेश मासुरकर यांनी केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Secondary engineer ACB net