शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या खात्यात १६ कोटींची बचत

By admin | Updated: January 30, 2016 01:55 IST

दुर्गम व ग्रामीण भागातील महिलांना बचतीची सवय लावण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती

दिगांबर जवादे गडचिरोलीदुर्गम व ग्रामीण भागातील महिलांना बचतीची सवय लावण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सप्टेंबर २०१४ मध्ये महिला समृध्दी बचत ठेव योजना सुरू केली असून अवघ्या दीड वर्षात सुमारे ५४ हजार ६४८ महिलांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. या खात्यांमध्ये महिलांनी १६ कोटी २० लाख रूपयांची बचत केली आहे. दूरच्या गावात असलेली बँक, नागरिकांमध्ये बँक व्यवहारांबाबत असलेले अज्ञान यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बँक खात्यांची संख्या अत्यंत कमी होती. वेळेवर एखाद्या शासकीय योजनेसाठी बँक खात्याची गरज पडल्यास फार मोठी अडचण निर्माण होत होती. विशेष करून महिलांचे बँक खाते अतिशय कमी प्रमाणात काढण्यात आले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिला समृध्दी बचत ठेव योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महिलांचे बँक खाते काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली. विशेष करून दुर्गम व ग्रामीण भागातील महिलांचे खाते काढण्यास विशेष प्राधान्य देण्यात आले. योजना सुरू झाल्यापासून अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत सुमारे ५४ हजार ६४८ महिलांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. या खात्यांमध्ये महिलांनी १६ कोटी २० लाख रूपयांची बचत केली आहे. शेतमजुरी व इतर कामांचे पैसे गोळा झाल्यानंतर महिला वर्ग बँक खात्यामध्ये रक्कम जमा करतात. यामुळे महिलांना बचतीची सवय लागण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर एखाद्या वेळेस पैशाचे काम पडल्यास बँक खात्यातून रक्कम काढली जात आहे. त्यामुळे वेळेवरच्या गरजेसाठी उधारवाडी करण्याची गरज पडत नाही. २५५ महिला बनल्या स्वावलंबी या योजनेच्या माध्यमातून बँक खाते काढलेल्या महिलेला कोणतेही तारण न घेता बचतीच्या दुप्पट अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या कर्जावर केवळ १२ टक्के व्याज आकारले जाते. त्यामुळे काही महिला बचत गटाकडून जास्त व्याजाचे कर्ज घेण्यापेक्षा बँकेकडून कर्ज घेण्यास पसंती दर्शवित आहेत. दीड वर्षात सुमारे २५५ महिलांनी कर्ज घेऊन स्वत:चा व्यवसाय थाटला आहे. व्यवसायाबरोबरच घरगुती कामासाठीसुध्दा कर्जाचे वितरण करण्यात येत आहे. या योजनेमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या असून त्यांना बचतीची सवय लागली आहे. कर्मचाऱ्यांनी घेतली मेहनतमहिलांचे बँक खाते काढण्यासाठी दुर्गम व ग्रामीण भागाला प्राधान्य देण्यात आले होते. महिलांना बँक खात्याचे महत्त्व पटवून देऊन बँक खाते काढण्याची जबाबदारी प्रत्येक शाखेच्या कर्मचाऱ्यावर सोपविण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला उद्दीष्टही देण्यात आले होते. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी महिलांना प्रोत्साहित केल्याने अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत महिलांचे ५४ हजार ६४८ बँक खाते काढण्यात आले आहेत.बँक व्यवहारांविषयी महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने बँकेने महिला समृध्दी बचत ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. बँक खाते काढल्यामुळे महिलांना बचत करण्यासही प्रोत्साहन मिळाले आहे. भविष्यात प्रत्येक महिलेचे बँक खाते असावे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रयत्नरत आहे. - सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोली