शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

कोंढाळा-वैनगंगा नदीपात्रातून रेती तस्करी जोमात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:25 IST

देसाईगंज तालुक्यातील दरवर्षी नदीघाटांचे लिलाव होऊन करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो. सद्य:स्थितीत नदी घाटांचे लिलाव ...

देसाईगंज तालुक्यातील दरवर्षी नदीघाटांचे लिलाव होऊन करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो. सद्य:स्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने अवैध रेती चोरीचे प्रमाण वाढून ट्रॅक्टरने व इतर साधनांचा वापर करून विनापरवाना वाहतूक करून रेती चोर मालामाल होत आहेत. कोंढाळा गावानजीकच वैनगंगा नदी आहे. गावानजीक वैनगंगा नदीपात्र असल्याने नेमका याच संधीचा फायदा काही ट्रॅक्टरधारक व इतर घेत असून, नदीपात्रातून अवैध रेतीचा उपसा करून रेती विक्री करीत असल्याचे आढळून येत आहे. रेतीच्या अवैध उपशामुळे नदीपात्र खोलगट स्तरापर्यंत पोहोचले आहे. अंदाजे शेकडो ते हजारो रेती ब्रासचा उपसा यापूर्वी व सद्य:स्थितीत सुरूच आहे. ट्रॅक्टरधारकांचे सर्वत्र धागेदोरे व जाळे पसरलेले असल्याने मोबाइल संपर्काद्वारे सर्वत्र संपर्क करून हालहवाला घेतला जातो व रेतीचा अवैधरीत्या उपसा केला जातो.

रेतीचा अवैधरीत्या उपसा करण्यासाठी रात्री १२ नंतरचा कालावधी रेती चोरांसाठी फलदायी असल्याचे कळते. शासन स्तरावरून कितीही कठोर व ठोस पावले उचलली जात असली तरी अवैध रेतीचा उपसा करून चोरीची रेती विकली जातच आहे. लाखो रुपयांचा दंड आकारूनही दंडाला न जुमानता ‘चलती का नाम गाडी’ असे चित्र निर्माण झाले आहे. शासन स्तरावरून रेती चोरीचे प्रकरण होऊ नये यासाठी आणखी काही बदल करून रेती तस्करीला कसा आळा घालता येईल, यावर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे. काही दिवसांपूर्वी महसूल प्रशासनाकडून खड्डे खोदले गेले; पण अजून पुन्हा रेती तस्करीकडून खड्डे बुजविली गेली, अशी घटना एकदा नाही तर दोनदा झाली असून, आता रेती तस्करी सुरूच आहे. ये-जा करणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. स्थानिक ग्रामपंचायत कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.