शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

संभू नरका जागरण पंडूम साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 02:00 IST

संभू गौराल गोटूल मांदी शाखा मुडेवाही, रेगुलवाही, बेज्जूरपल्ली, मोतुकपल्लीच्या सामूहिक सहकार्याने

शेकडो आदिवासी बांधवांची उपस्थिती सिरोंचा : संभू गौराल गोटूल मांदी शाखा मुडेवाही, रेगुलवाही, बेज्जूरपल्ली, मोतुकपल्लीच्या सामूहिक सहकार्याने द्विदिवसीय संभू नरका जागरण पंडूम साजरा झाला. सदर सोहळ्याचे आयोजन जागतिक गोंड सगा मांदी जिल्हा शाखा, गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली मार्गदर्शक विश्वनाथ कोकोडे होते. उद्घाटन चांदागड मुर्शेनाल आनंद मडावी (गोंदिया) यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून नारायण तलांडे, तोर मुर्शेनाल भगवान मडावी होते. रेगुलवाहीचे सरपंच लिंगा वेलादी, उपसरपंच गणपत नैताम, बेजुरपल्लीच्या सरपंच इप्पो मडावी, रेगुलवाहीच्या गणमान्य रामबाई गावडे आदींच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुधाकर नैताम, सुरेश कुळमेथे, सिद्धू कुळमेथे, रंगा मडावी, बापू कुलसंगे, बापू तलांडी, फुसुकपल्लीचे बापू पोरतेट यांच्यासह परसेवाडा परिसरातील शेकडो आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते. सोहळ्याच्या पहिल्या सत्रात संभू गवरा पेन ठाण्यापासून पेरसापेन झेंड्यापर्यंत ढोल, ताशा हाकुमीच्या आदिवासी तालासुरात मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पूजा पठाननंतर परसेवाडा पहाडीच्या निसर्गरम्य परिसरातील लिंगो-जंगो, संभू-गौरा पेन ठाण्याजवळ पुन्हा धार्मिक विधी पार पडले. युवक व तरूणांच्या रेला नृत्याने सादरीकरण करून पूर्ण रात्र जागरण झाले. दरम्यान मध्यांतरात ‘कोया पुनेम’ या विषयावर मुर्शेनाल आनंद मडावी यांनी पौराणिक व ऐतिहासिक दाखल्यांचा संदर्भ देऊन गोंडी धर्माचे श्रेष्ठत्व पटविले. या चर्चासत्राचे संचालन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकर मडावी यांनी केले. यावेळी गोंडी भजनाचा कार्यक्रमही पार पडला. आनंद मडावी यांच्या हस्ते गोंडी धर्मिय सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पेरसा पेन सेवा सेवा, पहांदी पारी कुपार लिंगोना सेवा सेवा, संभू गौराना सेवा सेवा, जय सेवा जय गोंडवानाचा सामूहिक जयघोष करण्यात आला. पंडूमच्या दुसऱ्या सत्रात बेजुरपल्ली येथे सुद्धा विविध धार्मिक विधीनुसार ध्वजारोहण करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)