शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियान सुरू

By admin | Updated: January 10, 2016 01:47 IST

वाहतूक नियम व रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने...

१० ते २४ पर्यंत पंधरवडा : वाहतूक शाखा व परिवहन विभागाचा पुढाकारगडचिरोली : वाहतूक नियम व रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने रविवारपासून २७ वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू होत आहे. या सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रम विभागाच्या वतीने राबविले जाणार आहेत. गडचिरोली वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानात वाहतुकीच्या नियमांचे बॅनर्स, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणारे अपघात याबाबत जनजागृती करण्यासाठी बॅनर्स, वाहतुकीच्या नियमांचे व चिन्ह दर्शविणारे पत्रक इंदिरा गांधी चौकातील राजीव भवनात वाटप केले जाणार आहेत. ११ जानेवारीला रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कलापथकाद्वारे कार्यक्रम व गडचिरोली शहरात रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. इंदिरा गांधी चौकात हेल्मेट व सीटबेल्टच्या वापराबाबत जनजागृती, मार्गदर्शन, वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत वाहनचालकांच्या डोळ्यांची तपासणी, स्पीडगनच्या सहाय्याने भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची तपासणी मोहीम, बैलबंडी तसेच वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, अवैध प्रवासी वाहतूकबाबत विशेष मोहीम, काळीपिवळी व आॅटो तसेच इतर वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी मोहीम, शाळकरी मुलांना वाहतूक चिन्ह व हातवारे सिग्नलचे प्रात्यक्षिक करून दाखविले जाणार आहे. त्याचबरोबर चित्रकला, निबंध स्पर्धा, खासगी वाहन चालक- मालक संघटनेची बैठक, अवैध प्रवासी वाहतुकीबाबत चर्चा, रस्ता सुरक्षा पंधरवड्याचा समारोप २१ जानेवारीला चित्रकला व निबंध स्पर्धेतील गुणवंतांना बक्षीस वितरणाने होणार आहे, अशी माहिती प्रभारी अधिकारी अमृता राजपुत यांनी दिली आहे. अपघातग्रस्तांची तज्ज्ञांकडून चिकित्सातज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अपघातग्रस्तांनी घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन, वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे शाळा महाविद्यालयात वाहतूक नियमांसंबंधी व्याख्यान व कार्यक्रम घेतले जाणार आहेत.