शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुभाजकाच्या लाखोंच्या नुकसानीची वसुली हजारात!

By admin | Updated: September 22, 2014 23:19 IST

शहरातील चारही मार्गावरील रस्ता दुभाजकांवर वाहने चढल्याने रस्ता दुभाजकांचे व विद्युत पोलचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र नगर परिषद प्रशासनाने या नुकसानीपोटी केवळ पाच हजार

गडचिरोली : शहरातील चारही मार्गावरील रस्ता दुभाजकांवर वाहने चढल्याने रस्ता दुभाजकांचे व विद्युत पोलचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र नगर परिषद प्रशासनाने या नुकसानीपोटी केवळ पाच हजार रूपयांची वसूली केली आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. दोन वर्षापूर्वी शहरातील मुख्य मार्गावर रस्ता दुभाजकांचे बांधकाम करण्यात आले. रस्ता दुभाजक बांधल्यानंतर दोन्ही बाजूने स्वतंत्र वाहने जात असल्याने मार्गाचे रूंदीकरण करणे आवश्यक होते. त्याचबरोबर दोन्ही बाजूला असलेले दुकानांचे अतिक्रमण काढणे व विद्युत खांब हटविणे गरजेचे होते. मात्र नगर परिषद प्रशासनाने याबाबतची खबरदारी न घेताच चारही मार्गावर रस्ता दुभाजकांचे बांधकाम केले. या रस्तादुभाजकांची उंचीसुद्धा कमी आहे. त्यामुळे रात्री येणाऱ्या वाहन चालकांना सदर रस्ता दुभाजक नजरेस पडत नाही. त्यामुळे रस्ता दुभाजकावर वाहन चढल्याच्या शेकडो घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनाने धडक दिल्याने रस्ता दुभाजकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्ता दुभाजकावरच पथदिवे लावले असल्याने आजपर्यंत अनेक पथदिवे तुटले आहेत. रस्ता दुभाजकाच्यामधून पाईप तार टाकून पथदिव्यांना विद्युत जोडणी दिल्या जाते. दुभाजक क्षतीग्रस्त झाल्यानंतर वायर तुटत असल्याने याच्या दुरूस्तीवरसुद्धा नगर परिषदेला खर्च करावा लागतो. सदर खर्च वाहनधारकाकडून वसूल करणे आवश्यक आहे. दोन वर्षाच्या कालावधीत शेकडो वाहनांनी दुभाजकांना धडक देऊन लाखो रूपयांचे नुकसान केले असले तरी नगर परिषदेकडे मात्र केवळ चारच वाहनांनी नुकसान केल्याची नोंद आहे. यामध्ये दोन वाहने रात्री पळून गेली. एका वाहन चालकाकडून ५ हजार रूपयांची नुकसाना भरपाई वसूल करण्यात आली. तर एका वाहनधारकावर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. दुभाजकांना धडक देण्याच्या घटना रात्रीच्या सुमारास घडत असल्याने त्यांच्याकडून वसूली करणे शक्य होत नाही. असे नगर परिषदेचे कर्मचारी सांगत असले रात्री धडक देणारी वाहने एक ते दोन दिवस घटनास्थळावरच अडकून पडतात. हे सत्य नाकारता येत नाही. मात्र नगर परिषदेचे कर्मचारी घटनास्थळावर जात नसल्याने वाहनधारकांकडून नुकसानीची रक्कम वसूल करणे शक्य होत नाही. (नगर प्रतिनिधी)