शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी जिल्हा करण्याची जबाबदारी आता भाजपवर

By admin | Updated: October 21, 2014 22:51 IST

विस्ताराने प्रचंड मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, हे नाग विदर्भ आंदोलन समितीची मागणी होती. या मागणीसह स्वतंत्र विदर्भ

अहेरी : विस्ताराने प्रचंड मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, हे नाग विदर्भ आंदोलन समितीची मागणी होती. या मागणीसह स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशीही मागणी नाविस सातत्याने करत राहिला. गेल्या काही वर्षात नाग विदर्भ आंदोलन समितीने या मागणीला घेऊन आंदोलनही केलेत. आता नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज हे महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी मर्यादित कालावधीत स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण करून या भागातील आदिवासी जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण कराव्यात, अशी मागणी अहेरी उपविभागातील शेकडो आदिवासी बांधवांनी केली आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला. या जिल्ह्यात उपविभागातील पाच तालुक्यांसह १२ तालुक्यांचा समावेश आहे. गडचिरोली हे जिल्हा मुख्यालय झाले असले तरी अहेरी उपविभागातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी या तालुक्यांचे गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचे अंतर किमान २५० किमीपेक्षा अधिक आहे. या भागातील तालुक्यातील गाव अरण्यप्रदेशात व दुर्गम भागात विस्तारलेली आहे. त्यांना गडचिरोली तालुका मुख्यालयात यायचे झाल्यास त्यांचा संपूर्ण दिवस या कामासाठी जातो. तसेच आर्थिक फटकाही त्यांना बसतो. त्यामुळे या भागातील जनता गेल्या अनेक वर्षापासून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा व्हावा, ही मागणी करीत आहे. अहेरी उपविभागातील तालुक्यांनी नक्षल समस्येने ग्रासलेले आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष आहे. जिल्हा निर्माण झाल्यापासून अहेरी उपविभागात एकही मोठा सिंचन प्रकल्प निर्माण होऊ शकला नाही. या भागात मोठ्या प्रमाणावर सिमेंट व लोह खनिजाचे साठे आहे. या भागात देवलमरी, सुरजागड येथे लोह व सिमेंट प्रकल्प सुरू करू असे आश्वासन आजवरच्या राज्यकर्त्यांनी दिले होते. मात्र एकही प्रकल्प येथे सुरू झाले नाही. त्यामुळे बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे व यातूनच नक्षलवाद वाढीला लागला आहे. या भागातील आदिवासींना समाजाच्या मुख्य धारेसोबत जोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत आहे. २०१० नंतर अहेरी जिल्ह्याची मागणी जोर धरू लागल्यावर तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने एटापल्ली येथे नवे उपविभागीय अधिकारी कार्यालय निर्माण केले व अहेरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय देण्यात आले. त्यांनतरही विकासाची प्रक्रिया गतीमान झाली नाही. या भागात वनकायद्यामुळे अनेक गावांना वीज पोहोचविण्यास अडचण आहे. जर अहेरी हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास या भागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळू शकते. अहेरी येथे एमआयडीसी निर्माण झाल्यास महाराष्ट्रातील उद्योजक येथे येऊन लोह खनिज उद्योग निर्माण करू शकतात. या भागाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला चालना मिळू शकते. स्वतंत्र जिल्हा झाल्यास येथे कुशल कामगार निर्माण करणाऱ्या अभियांत्रिकी शिक्षणाची व्यवस्थाही निर्माण होऊ शकते व या पाच तालुक्याच्या विकासाला गती देता येऊ शकते. त्यामुळे आता अहेरी जिल्हा निर्माण होणे काळाची गरज आहे, अशी भावना या भागातील आदिवासी, गैरआदिवासी समुदाय व्यक्त करीत आहे.अम्ब्रीशराव महाराजांच्या रूपाने एक तरूण लोकप्रतिनिधी या भागाला मिळाल्यामुळे या भागातील जनतेला अहेरी जिल्हा निर्माण होईल, अशी आशा वाटत आहे. नाग विदर्भ आंदोलन समितीने भारतीय जनता पक्षाला स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवरच पाठिंबा दिला होता. आता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे भाजपसोबत नाविसची तेवढीच जबाबदारी आहे, असे मतदारांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)