शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

येंगलखेडावासीयांच्या लढ्यानंतर तलावाची दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

यापूर्वी पाळ फुटल्याने नुकसान झालेल्या या तलावाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार होता. लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे यांनी ही अडचण दूर केली. त्यांनी मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून १४ हजार मनुष्यबळ दिवस इतका रोजगार उपलब्ध करून दिला. तलावाच्या कालव्याची लांबी २ हजार १०० मीटर आहे. या तलावाच्या पाण्यामुळे यावर्षीच्या ३४४ एकरातील खरीप हंगामासाठी सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्दे३४४ एकराला सिंचनाची क्षमता : जिल्हाधिकारी सिंगला यांच्या हस्ते जलपूजन

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : वनकायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या जांभुळखेडा येथील सिंचन तलावासाठी गावकऱ्यांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. तलावासोबत कालव्याचेही काम पूर्ण झाले आहे. गुरूवारी (दि.२३) जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते जलपूजन झाल्यानंतर शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्याने जांभुळखेडावासीयांनी आनंद व्यक्त केला. या तलावामुळे ३४४ एकर श्ोती सिंचनाखाली येणार आहे. हा तलाव गावाच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे.यावेळी आमदार कृष्णा गजबे, उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, सिनेट सदस्य चांगदेव फाये, तहसीलदार सोमनाथ माळी, गटविकास अधिकारी अनिता तेलंग, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता भूमेश दमाहे, उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे, वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल, सरपंच शिवाजी राऊत व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.यापूर्वी पाळ फुटल्याने नुकसान झालेल्या या तलावाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार होता. लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे यांनी ही अडचण दूर केली. त्यांनी मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून १४ हजार मनुष्यबळ दिवस इतका रोजगार उपलब्ध करून दिला. तलावाच्या कालव्याची लांबी २ हजार १०० मीटर आहे. या तलावाच्या पाण्यामुळे यावर्षीच्या ३४४ एकरातील खरीप हंगामासाठी सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. एकूणच हा तलाव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. गावकरी, राजकीय नेते आणि अधिकारी यांनी एकत्र येऊन काम केले तर काय परिवर्तन होऊ शकते, याचे जांभूळखेड्याचा तलाव हे उत्तम उदाहरण आहे.अन् तलाव पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालाजांभुळखेडा गावाच्या पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर ४० हेक्टर जागेत असलेला सिंचन तलाव वनकायद्याच्या कचाट्यात सापडला होता. दरम्यान १९८५ च्या पावसाळ्यात पाळ फुटल्याने तलावाचे अतोनात नुकसान झाले. तलावाच्या दुरूस्तीसाठी गावकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला.

टॅग्स :Damधरण