शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

दिभना-अमिर्झा मार्गाचे नूतनीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:25 IST

गडचिराेली : तालुक्यातील दिभना-अमिर्झा या ९ किमी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सदर मार्गाची दुरुस्ती करून ...

गडचिराेली : तालुक्यातील दिभना-अमिर्झा या ९ किमी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सदर मार्गाची दुरुस्ती करून नूतनीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. दिभना अमिर्झा मार्गाने अमिर्झा परिसराच्या १० गावातील नागरिक जिल्हा मुख्यालयात ये-जा करतात. सदर मार्गावरून वाहनांची माेठ्या प्रमाणात वर्दळ असते. मागील ३ वर्षांपासून सदर मार्गाची दुरवस्था झाली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सदर मार्गाची केवळ डागडुजी केली जाते; परंतु पक्की दुरुस्ती किंवा नूतनीकरण केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना खड्डेमय रस्त्यानेच प्रवास करावा लागताे.

ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालावा

काेरची : नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील अंतर्गत भागातील लहान रस्त्यावरही अवजड वाहने नेण्यात येत असल्याने या रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

स्वच्छता अभियानात हवी गतिमानता

देसाईगंज : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे. मात्र, त्यामध्ये गती नसल्याने लोकसहभाग दिसून येत नाही. नाल्या, रस्ते व सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने जागृती अभियान राबविण्याची मागणी आहे.

शासकीय योजनांची माहिती नागरिकांना द्या

आरमाेरी : केंद्र व राज्य शासनाकडून नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहोचविली जात नाही़ परिणामी, पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहतात. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास योग्य माहिती मिळत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.

प्लॅस्टिक पिशव्यांना आळा घाला

गडचिराेली : शहरात दिवसेंदिवस प्लस्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात़. या पिशव्या कुठेही टाकून देण्याचे प्रकार वाढल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

बीपीएल यादीचे सर्वेक्षण करावे

धानाेरा : गोरगरिबांना धान्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी बीपीएलधारकांची यादी करण्यात आली आहे. मात्र या यादीत गोरगरिबांऐवजी सधन कुटुंबांचीच नावे समाविष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक योजना कागदोपत्रीच असल्याने गरजू नागरिक विकासापासून वंचित आहेत.

निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत

कुरखेडा : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्याचे छप्पर उडून गेले आहे. जिल्हा परिषदेने यासाठी निधी देण्याची मागणी सरपंचांनी केली.

तंटामुक्त समित्यांना सक्रिय करा

वैरागड : तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावातील तंटे गावात सोडविण्यासाठी गावागावात तंटामुक्त समितीची स्थापना केली. पूर्वी या समितीला चांगले दिवस होते. मात्र सद्यस्थितीत या समित्या अकार्यक्षम असल्याने वाद वाढत आहे.

नवीन वस्त्यांमध्ये डुकरांकडून त्रास

सिराेंचा : शहरातील काही नवीन वस्त्यांमध्ये डुकरे मोकाट फिरत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.