शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षक, पेपरसेटर व माॅडरेटरचे मानधन प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST

गडचिराेली : स्थानिक गाेंडवाना विद्यापीठाद्वारे परीक्षेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या परीक्षक, पेपरसेटर व माॅडरेटर आदींचे मानधन प्रलंबित आहे. हे मानधन ...

गडचिराेली : स्थानिक गाेंडवाना विद्यापीठाद्वारे परीक्षेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या परीक्षक, पेपरसेटर व माॅडरेटर आदींचे मानधन प्रलंबित आहे. हे मानधन लवकर अदा करण्यात यावे, अशी मागणी गाेंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असाेसिएशनने केली आहे. यासंदर्भात प्रभारी कुलसचिव व परीक्षा नियंत्रक डाॅ.अनिल चिताडे यांना निवेदन देण्यात आले.

निवेेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर-गोंडवाना विद्यापीठाद्वारे होणाऱ्या विविध परीक्षांकरिता अनेक विषयातील प्राध्यापकांची परीक्षक, प्राश्नीक आणि माॅडरेटर म्हणून नियुक्त केली जाते. यामध्ये नियुक्त प्राध्यापकाच्या वतीने विविध परीक्षांसंबंधीची कार्य अत्यावश्यक सेवा म्हणून तत्परतेने केली जातात. मात्र सदर कार्याचे मानधन प्राध्यापकांना वेळेवर विद्यापीठाकडून प्राप्त होत नाही.

गोंडवाना विद्यापीठाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयातील प्राध्यापकवृंद अनेक वर्षांपासून परीक्षक,पेपरसेटर आणि मॉडरेटर म्हणून कार्य करीत आहे. मात्र अनेक सत्रातील झालेल्या परीक्षेचे मानधन प्राध्यापकांना वेळेवर प्राप्त झाले नाही. यासंदर्भात डॉ. चिताडे यांनी शिष्टमंडळासमक्ष विद्यापीठाचे लेखाधिकारी आणि परीक्षा विभागाचे सहायक कुलसचिव यांच्याशी चर्चा करून सदर प्राध्यापकांचे परीक्षा कार्यासंबंधी प्रलंबित मानधन लवकर काढून देण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी शिष्टमंडळात यंग टीचर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव प्रा. विवेक गोरलावार व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगेश्वर दुधपचारे, उपाध्यक्ष डॉ. राजू किरमिरे, उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते, सहसचिव डॉ.श्रीराम गहाणे, विभाग समन्वयक प्रा. निलेश हलामी,डॉ. प्रफुल्ल बनसोड, डॉ. अभय लाकडे, प्रा. किशोर कुडे, डॉ. लक्ष्मण कांबळे, डॉ.पी.एम.राजुरवाडे, डॉ. एच.टी. गजभिये यांचा समावेश होता.