कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढा

By Admin | Updated: August 24, 2016 02:22 IST2016-08-24T02:22:42+5:302016-08-24T02:22:42+5:30

राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात शासनाकडे सातत्त्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

Remove the demands of the employees | कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढा

कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढा

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट : चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे निवेदन
गडचिरोली : राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात शासनाकडे सातत्त्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र मागण्या प्रलंबित आहेत. प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
या संदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष लतीफ पठाण, जिल्हा सरचिटणीस किशोर सोनटक्के यांच्या नेतृत्त्वात निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. यावेळी कर्मचारी संघटनेचे सदस्य रवी पेद्दीवार, विनोबा गराडे, विस्तारी फेबुलवार, स्नेहल संतोषवार, सी. एन. नंदेश्वर, अरूण होळी, सांडे आदींसह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात कामगार नेते तथा संघटनेचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण, मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला जिल्हा संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजन लागू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Web Title: Remove the demands of the employees