शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‎'​लाल साम्राज्या'चा डोलारा कोसळला; नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता 'देवजी'ने गुडघे टेकले! ‎

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 13:07 IST

तेलंगणात केले आत्मसमर्पण

‎​गडचिरोली : देशातील नक्षलवादी चळवळीचा कणा समजला जाणारा आणि सुरक्षा यंत्रणांच्या हिटलिस्टवर असलेला सर्वोच्च जहाल नक्षलवादी नेता आणि नक्षल संघटनेचा महासचिव थिप्परी तिरुपती ऊर्फ 'देवजी' याने आपला खंदा समर्थक आणि सीसीएम सदस्य संग्राम याच्यासह तेलंगणा पोलिसांसमोर गुडघे टेकल्याची माहिती आहे.  नक्षल चळवळीच्या इतिहासातील हा आतापर्यंतचे हे सर्वोच्च आत्मसमर्पण मानले जात आहे.‎​‎नक्षल्यांचा सर्वोच्च नेता नेता बसवाराजूच्या खात्म्यानंतर लाल साम्राज्याची संपूर्ण सूत्रे देवजीच्या हातात आली होती. केवळ छत्तीसगडमध्येच त्याच्यावर १.५ कोटी रुपयांचे इनाम आहे, तर संग्रामवर १ कोटींचे बक्षीस आहे. गेल्या चार दशकांपासून पोलिसांना गुंगारा देणारा हा 'मास्टरमाईंड' ढासळत्या प्रकृतीमुळे किंवा संघटनेत सुरू असलेल्या अंतर्गत फुटीमुळे शरण आल्याचे बोलले जात आहे. यास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.‎​‎‎​नक्षलवादाचा 'काऊंटडाऊन' सुरू!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्चपूर्वी बस्तर नक्षलमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. याच पार्श्वभूमीवर देवजीचे शरण येणे हा नक्षलींसाठी 'डेथ वॉरंट' ठरू शकतो. एकेकाळी हजारो नक्षलवाद्यांचा वावर असलेल्या बस्तरमध्ये आता जेमतेम २०० सशस्त्र नक्षली उरल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.‎महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड (MMC) जोडणारा नक्षल्यांचा सुरक्षित मार्ग आता सुरक्षा दलांनी पूर्णपणे विखुरला आहे.‎‎​कोण आहे हा 'देवजी'? 

‎​देवजी हा नक्षलवादी संघटनेच्या 'पॉलिट ब्युरो'चा सदस्य असून तो चळवळीचा मुख्य रणनीतीकार मानला जातो. नक्षलवाद्यांचे आंतरराष्ट्रीय संपर्क, शस्त्रास्त्रांची रसद आणि मोठ्या हल्ल्यांचे नियोजन त्याच्याच इशाऱ्यावर होत असे. तो पोलिसांच्या ताब्यात आल्याने नक्षलवाद्यांच्या आगामी घातपाती कारवायांचा कट उधळून लावण्यात यश आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Red Empire Collapses: Top Naxal Leader 'Devji' Surrenders to Police!

Web Summary : In a major blow to Naxalism, top leader Devji surrendered to Telangana police with a key aide. After Basavaraju's death, Devji controlled operations. His surrender, linked to health or internal strife, signals a 'countdown' for Naxalites, especially with increased security efforts.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारीTelanganaतेलंगणा