शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

रेती लिलावातून १०२ कोटींचा महसूल प्राप्त

By admin | Updated: September 4, 2016 01:59 IST

रेती घाटांच्या लिलावातून २०१५-१६ या आर्थिक वर्षात शासनाला तब्बल १०२ कोटी ८३ लाख ७८ हजार ११० रूपयांचा महसूल मिळाला आहे.

तीन टप्प्यात लिलाव : यावर्षी उत्पन्न वाढणारगडचिरोली : रेती घाटांच्या लिलावातून २०१५-१६ या आर्थिक वर्षात शासनाला तब्बल १०२ कोटी ८३ लाख ७८ हजार ११० रूपयांचा महसूल मिळाला आहे. २०१६-१७ मध्ये महसूलात वाढ होण्याची शक्यता जिल्हा खनिकर्म विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. २०१५-१६ या वर्षात पहिल्या टप्प्यात ४२ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला. या रेतीघाटांची ५ कोटी ६३ लाख ३ हजार रूपये एवढी अपसेट प्राईस ठेवण्यात आले होते. प्रत्यक्ष लिलावाच्या माध्यमातून ६ कोटी १४ लाख ७८ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला. जानेवारी २०१६ या महिन्यात ११ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला. १ कोटी ९३ लाख ७२ हजार रूपये अपसेट प्राईस ठेवण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र या रेती घाटांचा लिलाव २ कोटी ९८ हजार रूपयांना झाला. तिसरा टप्पा फेब्रुवारी २०१६ मध्ये पार पडला. यामध्येही पाच रेती घाटांचे लिलाव झाले. या लिलावाच्या माध्यमातून ४५ लाख ३५ हजार रूपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यासाठी लिलावाची प्रक्रिया वेळेवर होणे अत्यंत आवश्यक आहे. (प्रतिनिधी)