एक लाखावर उत्पन्न असल्यास रेशन कार्ड रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST2021-02-05T08:49:24+5:302021-02-05T08:49:24+5:30

गडचिराेली : १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधित बाेगस लाभार्थ्यांचा शाेध घेतला जाणार असून, त्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा ...

Ration card canceled if income is above one lakh | एक लाखावर उत्पन्न असल्यास रेशन कार्ड रद्द

एक लाखावर उत्पन्न असल्यास रेशन कार्ड रद्द

गडचिराेली : १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधित बाेगस लाभार्थ्यांचा शाेध घेतला जाणार असून, त्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे. तसेच वास्तव्याचा पुरावाही जाेेडणे आवश्यक करण्यात आले आहे.

गरीब कुटुंबांना नाममात्र दरात गहू व तांदूळ शासनामार्फत उपलब्ध करून दिला जातो. या याेजनेवर शासनाचे महिन्याला शेकडाे काेटी रुपये खर्च हाेतात. याेजनेचा लाभ गरीब व गरजू कुटुंबानेच घेणे अपेक्षित आहे; मात्र अनेक श्रीमंत कुटुंबांकडूनही या याेजनेचा लाभ घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा शाेध या माेहिमेत घेतला जाणार आहे. शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयातील कर्मचारी, कामगार यांचे ज्ञात उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक आढळून आल्यास त्यांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे. एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेली अनेक कुटुंबं धान्य उचलत असल्याने त्यांच्या रेशनकार्डांवर संक्रांत येणार आहे.

बाॅक्स

हे पुरावे सादर करावे लागणार

रहिवासी पुरावा म्हणून भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीचा पुरावा, एलपीजी गॅस जाेडणी, बॅंक पासबुक, विजेचे देयक, टेलिफाेन, वाहन चालविण्याचा परवाना, कार्यालयाचे ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी एक दाखला रहिवासी पुरावा म्हणून करावा लागणार आहे.

या कारणाने रद्द हाेईल रेशनकार्ड

रेशनकार्डधारकाने एकही रहिवासी पुरावा सादर केला नाही, तसेच त्याचे एकूण वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आल्यास संबंधिताचे रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे. एकाच पत्त्यावर, एकाच कुटुंबात दाेन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत. एकाच पत्त्यावर दाेन शिधापत्रिका बीपीएल किंवा अंत्याेदय असणार नाही. विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका राहणार नाही. स्थलांतरित व्यक्ती तसेच मृत व्यक्तींना वगळले जाईल.

बाॅक्स

प्रत्येकाला भरून द्यावा लागणार अर्ज

तलाठी व इतर शासकीय कर्मचारी यांच्यामार्फत तपासणी माेहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला एक अर्ज दिला जाईल. हा अर्ज संबंधित व्यक्तीने भरून देणे आवश्यक आहे. या अर्जात शिधापत्रिकाधारकाचे नाव, वय, व्यवसायाचा पत्ता, निवासी पत्ता, व्यवसाय किंवा नाेकरीची माहिती, शिधापत्रिकेत असलेल्या व्यक्तींची नावे ही माहिती भरून द्यावी लागणार आहे. साेबत रहिवासी दाखला जाेडावा लागणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर पाेचपावती दिली जाणार आहे.

बाॅक्स

धान्य वितरण तत्काळ हाेणार बंद

रहिवासी पुरावा असलेली एक यादी तसेच पुरावा नसलेल्यांची दुसरी यादी तयार केली जाणार आहे. पुरावा नसलेल्या शिधापत्रिका तत्काळ निलंबित केल्या जातील. पुरावा सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतरही पुरावा सादर न केल्यास शिधापत्रिका रद्द करून त्या शिधापत्रिकेवर धान्य देणे बंद केले जाईल. एकूण रेशनकार्ड - २,२६,५८८

केशरी रेशनकार्ड - ९६,५५७, अंत्याेदय रेशनकार्ड - ९२,१३४, बीपीएल रेशनकार्ड - ३१,२००

Web Title: Ration card canceled if income is above one lakh