शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
4
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
5
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
6
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
7
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
8
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
9
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
10
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
11
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
12
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
13
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
14
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
15
ह्रदयद्रावक! नातीचा मृतदेह मांडीवर ठेवून आजोबांनी काढली रात्र; चाळीसगावमधील संतापजनक घटना
16
Adhik Maas 2026: अधिक मासात संकटमुक्तीसाठी करा 'ही' दत्तसेवा; मिळेल श्री दत्तगुरूंचा अखंड आशीर्वाद!
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातविरुद्ध दोषारोपपत्र; ४९ दिवसांपासून कोठडीत; १०५ साक्षीदारांकडे चौकशी
18
Sambit Patra : "२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा सवाल
19
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
20
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रॅली

By admin | Updated: July 29, 2015 01:46 IST

२८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत माओवादी संघटनेतर्फे नक्षल शहीद सप्ताह साजरा केला जात आहे.

कमलापूर, धानोरा कडकडीत बंद : आंतरराज्यीय बसेसवरही परिणाम
गडचिरोली : २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत माओवादी संघटनेतर्फे नक्षल शहीद सप्ताह साजरा केला जात आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी अहेरी तालुक्यातील कमलापूर व धानोरा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली. तर एटापल्ली येथे पोलिसांनी मेळावा घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच एटापल्ली, पेरमिली येथे जनजागृती रॅली पोलीस प्रशासनाच्या वतीने काढण्यात आली.
नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाला सडेतोड उत्तर देण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून एटापल्ली या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नक्षल विरोधी शांतता रॅली काढण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेला मार्गदर्शन करताना नलावडे यांनी भरकटलेल्या नागरिकांना कोणतीही मदत करू नका, लोकशाही मार्गाने विकास शक्य आहे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, उपनिरीक्षक मदने, दवळी, देवरे यांच्यासह ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पेरमिली येथेही उपपोलीस ठाण्यांतर्गत नक्षल विरोधी रॅली काढण्यात आली. पेरमिलीचे ठाणेदार चांगदेव कोडेकर, सीआरपीएफचे कमांडंट राजकुमार, उपनिरीक्षक निमगिरे, हेमंत बोडे, मेजर झाडे, चांदेकर आदी उपस्थित होते.
धानोरा तालुका मुख्यालयात मंगळवारी बाजारपेठ बंद होती. मुरूमगाव येथील आठवडी बाजारही मंगळवारी भरला नाही. धानोराचे दुकान सकाळपासूनच बंद होते. धानोरावरून दररोज चालणारी खासगी व परिवहन महामंडळाची बससेवाही प्रभावीत झाली. परिवहन मंडळाच्या बसगाड्या गडचिरोलीवरून धानोरापर्यंतच गेल्या. धानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील गोडलवाही, कारवाफा, पेंढरी, मालेवाडा, मुरूमगाव आदी बसफेऱ्या आज बंद होत्या. चंद्रपूरवरून राजनांदगावकडे जाणारी खासगी प्रवासी वाहतुकीची वाहनेही आज बंद होती. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथेही बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. कोरची येथेही पहिल्या दिवशी बाजारपेठ बंद होती. एटापल्ली तालुक्यात एटापल्ली-जारावंडी, गेदा व बोलेपल्ली आदी मार्गावरील बस व खासगी वाहतूक दिवसभर बंद होती. यामुळे एटापल्लीच्या आठवडी बाजारावर परिणाम झाला. जिल्ह्यात नक्षल सप्ताहाच्या पहिल्या कुठलीही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांनी जोरदार कंबर कसली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)