शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाऊले चालती राजनांदगावची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

ब्रम्हपुरी येथे बोअरवेलच्या कामावर गेलेले सहा तरुण गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास विसोरा-शंकरपूर मार्गे छत्तीसगढ राज्यातील राजनांदगांव जिल्ह्यात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पायदळ प्रवासाला निघाले आहेत. ब्रह्मपुरी ते राजनांदगांव अशा तब्बल १७० किलोमीटर अंतराच्या पायी प्रवासाकरिता पहाटेच ब्रह्मपुरी नगर सोडल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमजुरांची घरवापसी : शेकडो किमीचा पायी प्रवास; ब्रह्मपुरीकडून राजनांदगावकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : घर सोडून आपण कुठेही बाहेर राहायला गेलो तरी घराची ओढ आपणास शांत बसू देत नाही. त्यात सध्याच्या कोरोनामय वातावरणात कडक संचारबंदी, राज्य आणि जिल्हा सीमा बंदी असताना स्थलांतरित मजुरांना मात्र घराकडे जाण्याचा मोह आवरता येईना अशी अवस्था झाल्याचे दिसून येते आहे. ब्रम्हपुरी येथे बोअरवेलच्या कामावर गेलेले सहा तरुण गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास विसोरा-शंकरपूर मार्गे छत्तीसगढ राज्यातील राजनांदगांव जिल्ह्यात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पायदळ प्रवासाला निघाले आहेत.ब्रह्मपुरी ते राजनांदगांव अशा तब्बल १७० किलोमीटर अंतराच्या पायी प्रवासाकरिता पहाटेच ब्रह्मपुरी नगर सोडल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ब्रह्मपुरी ते देसाईगंज या आंतरजिल्हा रस्त्यावरच्या वैनगंगा नदीवरील पुलावर पोलीस चौकी असताना तुम्ही कसे काय आले, असा प्रश्न केला असता. आम्हाला कुणीच अडवला नसल्याचे ते बोलले. राजनांदगांवकडे पायदळ जाणाऱ्या चार तरुणांच्या पाठीवर एक-एक बॅग आणि दोघांच्या हातात कापडी पिशवी होती. एकाने तोंडावर मास्क तर एकाने रुमाल बांधली. पिण्याच्या पाण्याशिवाय खाण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नव्हते. संचारबंदी वाढल्याने बसेसची व्यवस्था नाही. हे लक्षात आल्यावर त्यांनी पायदळ प्रवास सुरू केला.जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांचे गावातच विलगिकरणनागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चणा काढणी, धानकापणी, मिरची तोडणी या कामासाठी शंकरपूर, कसारी येथील महिला, पुरुष गेले होते. हे सर्व मजूर आता घरी परतले असून त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळा वा अन्य ठिकाणी विलगिकरणात ठेवले आहे. कोरोना विषाणूची लागण होण्याच्या भीतीपोटी बाहेरगावी कामावर गेलेले गावातील नागरिक आता घरी वापस येत असले तरी कुटुंबातील सदस्यही त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. गावातील दक्षता समिती बाहेरगावाहून गावांत येणाºया प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवून आहे. गावात येताच त्यांना विलग केल्या जात आहे.

टॅग्स :Labourकामगार