शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्य महाविद्यालयातर्फे जनजागृती

By admin | Updated: September 20, 2014 23:51 IST

स्थानिक फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्य या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागासह शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी व व्यसनमुक्तीबाबत

गडचिरोली : स्थानिक फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्य या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागासह शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी व व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली. सावरगाव - समाजकार्य महाविद्यालयाच्या एमएसडब्ल्यू भाग २ च्या सत्र तिनच्या विद्यार्थ्यांनी स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सावरगाव येथे पथनाट्य सादर केले. यावेळी सरपंच पुंडलिक सिडाम, तंटामुक्त अध्यक्ष ऋषी सिडाम, ग्रामसचिव सचिन कन्नाके आदींसह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते. या पथनाट्यात पोचय्या कुडमेथे, विजय मंडल, योगेश राऊत, शरद शेडमाके, हिना पठाण, काजल मेश्राम आदींनी सहभाग घेतला. समाजामध्ये मुलींविषयी काही चुकीच्या समजूती पसरल्या असल्याने काही पालक मुलीची गर्भातच हत्या करतात किंवा जन्मानंतर तिला फेकून दिले जाते. आजपर्यंत अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्याने दिवसेंदिवस बालिकांची संख्या कमी होत चालली आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात लग्नासाठी वधू मिळणे कठिण होईल. मुलाच्या तुलनेत मुली कोणत्याही बाबतीत कमी नाही, असे मार्गदर्शन पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आले.कुरखेडा - एमएसडब्ल्यू भाग २ च्या गट क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी समवर्ती सराव अध्ययनांतर्गत कुरखेडा येथे पथनाट्य सादर करून हुंडाबळीबाबत जनजागृती केली. पथनाट्यात सोनम येरमे, अल्का भोयर, विजय सिडाम, सुनिल कुलसंगे, छगन दाफोटे, नारायण कुमरी, आनंद दुर्गम, लक्ष्मी कोठारे आदींनी सहभाग घेतला. हुंडाबळीसाठी विवाहीत महिलेला पती, सासू-सासरे यांच्याकडून त्रास दिला जातो. पैशाच्या हव्यासापोटी कधीकधी वधूचा खूनही केल्या जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. सुसंस्कृत समाजासाठी ही अत्यंत लांच्छनास्पद बाब आहे. दुसऱ्याची मुलगी आपल्या घरची सून आहे. त्याचप्रमाणे आपलीही मुलगी दुसऱ्या घरी नांदत असेल याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे, अशी जनजागृती पथनाट्याद्वारे करण्यात आली.गडचिरोली - बीएसडब्ल्यू भाग तिनच्या विद्यार्थ्यांनी गुरूवारी शहरातील सुभाष वॉर्ड, हनुमान वार्डात पथनाट्याद्वारे व्यसन सोडण्याविषयी व स्वच्छतेबाबत जनजागृती केली. सदर पथनाट्य मार्गदर्शीका प्रा. गुटले व प्रा. गोर्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या पथनाट्यात रूपेश पेंटलवार, अंकिता सावसाकडे, मिना नास्कुलवार, पल्लवी नंदागिरवार, पंकज नैताम, भारती रोहणकर, सोनाली पोरेड्डीवार, मुकेश नागापुरे, निदा शेख, बाबुलाल रामटेके, अक्षय कोसनकर यांनी सहभाग घेतला. यावेळी वार्डातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)