शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

पं. स. सदस्यासह आठ जणांना अटक

By admin | Updated: October 18, 2014 01:29 IST

मुलचेरा पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या आष्टी येथील पोलीस चौकीत पोलिसांसोबत धक्काबुक्की करून गोंधळ..

मुलचेरा : मुलचेरा पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या आष्टी येथील पोलीस चौकीत पोलिसांसोबत धक्काबुक्की करून गोंधळ घातल्याप्रकरणी मुलचेरा पंचायत समितीचे सदस्य सुभाष गणपती यांच्यासह ८ जणांना पोलिसांनी अटक केल्याची घटना गुरूवारी रात्री २ वाजताच्या सुमारास आष्टी येथे घडली. पोलिसांनी या आठही आरोपींना चामोर्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या सर्व आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुलचेरा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या आष्टी येथील वनविभागाच्या नाक्यावर पोलिसांनी कोपरअल्ली येथील सुबल मंडल यांच्या एम. एच. ३४- ९३३८ या क्रमांकाच्या बोलेरो वाहनातून एक पेटी विदेशी दारू पकडली. ही घटना १६ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर आष्टी पोलीस चौकीत आरोपी सुबल मंडल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. दरम्यान याच रात्री १० वाजताच्या सुमारास पं. स. सदस्य सुभाष गणपती, शिवसेना तालुका प्रमुख निलकमल मंडल, उत्तम शर्मा, निखील हलदार, गोपाल मिर्झा, संजय हलदार, सुदेव वैद्य व विद्युत मंडल हे आठजण आष्टीच्या पोलीस चौकीत आले. यावेळी त्यांनी सहाय्यक फौैजदार संघरक्षित फुलझेले व भजन कोडाप यांना सुबल मंडल यांच्या वाहनातून दारू पकडली. त्याच्यावर कोणती कारवाई केली, हे आम्हाला सांगा, अशी विचारणा करू लागले. दरम्यान फौजदार फुलझेले व भजन कोडाप यांना त्यांनी धक्काबुक्की केली. वरील आठही जणांनी पोलीस चौकीत येऊन गोंधळ घातल्याची तक्रार आष्टी पोलिसांनी मुलचेरा पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून मुलचेरा पोलिसांनी पं. स. सदस्य सुभाष गणपती यांच्यासह आठही आरोपींवर भादंविचे कलम १४३, १४५, १४७, १४९, ३५३, २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. आज शुक्रवारी चामोर्शी न्यायालयासमोर आठही आरोपींना हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)