शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्कधारकांचे धान खरेदी न केल्यास आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:36 IST

देसाईगंज : जिल्ह्यातील आधारभूत खरेदी केंद्रावर वनहक्कधारकांचे धान खरेदी केले जात नसल्याने त्यांना खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत ...

देसाईगंज : जिल्ह्यातील आधारभूत खरेदी केंद्रावर वनहक्कधारकांचे धान खरेदी केले जात नसल्याने त्यांना खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. यात बराच ताेटा शेतकऱ्यांना हाेत आहे. २८ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी वनहक्कधारकांच्या धान खरेदी विक्रीचा मार्ग माेकळा करण्याचे आश्वासन दिले हाेते. परंतु अद्यापही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ८ जानेेवारीच्या आत वनहक्कधारकांचे धान खरेदी करावे, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा आ.कृष्णा गजबे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. भाजपच्या शिष्टमंडळाने २८ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वनहक्कधारकांच्या धानाची खरेदी आधारभूत केंद्रावर करण्याची मागणी केली हाेती. आ.गजबे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन ही समस्या साेडविण्याची मागणी केली हाेती. त्यानंतर ना.भुजबळ यांनी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले हाेते. परंतु कार्यवाही झाली नाही. विशेष म्हणजे वनहक्क अधिनियम २००५ अन्वये शेतकऱ्यांना वनजमिनी दिल्या आहेत. परंतु त्यांना नमुना-८ अद्यापही प्राप्त झाला नाही. वनामधील जमिनीचे धारणक्षेत्र निश्चित करण्यात आलेल्या शासकीय कागदपत्रांच्या आधारे धान खरेदी करण्यात यावी, अशी तरतूद परिपत्रकात करण्यात आल्याची माहितीसुद्धा देण्यात आली हाेती. त्यानुसार दाेन दिवसात वनहक्कधारकांच्या धानाची खरेदी आधारभूत खरेदी केंद्रावर करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले हाेते. परंतु कार्यवाही झाली नाही. वनहक्कधारकांचे धान आधारभूत केंद्रावर खरेदी केले जात नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे लवकर समस्या साेडवावी, अन्यथा भाजपच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडक माेर्चा काढण्यात येईल, असा इशारा आ.गजबे यांनी दिला. तसेच धान खरेदीची मर्यादा वाढवून हेक्टरी ३० क्विंटल धान खरेदी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. शिष्टमंडळात भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आ.डाॅ.देवराव हाेळी, न.प.उपाध्यक्ष माेतीलाल कुकरेजा, पं.स.सदस्य रामरतन गाेहणे यांचा समावेश हाेता.