शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

रक्षक बनले भक्षक

By admin | Updated: January 5, 2015 23:02 IST

आरक्षित वनक्षेत्राच्या परिसरात साधा प्रवेश करायचे म्हटले तरी तेथे परवानगी घ्यावी लागते. या परिसरात कायदेशीर कामे करण्याकरितादेखील परवानगीची गरज असते. मात्र त्याला अहेरी

जेसीबी, ट्रॅक्टर सोडले : मलमपल्ली आरक्षित जंगलात वन विभागाकडून अवैध उत्खनन
ए. आर. खान - अहेरी
आरक्षित वनक्षेत्राच्या परिसरात साधा प्रवेश करायचे म्हटले तरी तेथे परवानगी घ्यावी लागते. या परिसरात कायदेशीर कामे करण्याकरितादेखील परवानगीची गरज असते. मात्र त्याला अहेरी वनपरिक्षेत्रातील अधिकारी अपवाद असावेत, असे एक प्रकरण उघडकीस आले आहे. ‘रिझर्व्ह झोन’ असलेल्या आलापल्ली वनविभागांतर्गत येणाऱ्या अहेरी वनपरिक्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी संबंधीत वनाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे. मात्र मलमपल्ली गावात वनविभागाच्याच या अधिकाऱ्यांनी कोणतीही परवानगी न घेता गौण खनिजाचे अवैध उत्खनन केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आलापल्ली वनविभागांतर्गत अहेरी वनपरिक्षेत्रात मलमपल्ली गावातील पोच मार्गाच्या कडेला आलापल्ली-सिरोंचा राजमार्गावर आरक्षित जंगल परिसरात कक्ष क्रमांक २८ मध्ये २ जानेवारीला दुपारी अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन करण्यात आले. गौण खनिजाचे उत्खनन करून त्याची खासगी कामांकरिता विक्री करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गालगत मलमपल्ली राखीव जंगल भागात कक्ष क्रमांक २८ मध्ये अवैध मुरूम उत्खनन होत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. त्यांची शहानिशा करण्याकरिता प्रस्तुत प्रतिनिधीने घटनास्थळाला भेट दिली. तेव्हा तेथे एक जेसीबी मशीन, दोन ट्रॅक्टर ट्राली व वाहनचालक आढळून आले. यावेळी त्यांच्यासोबत वनपरिक्षेत्राधिकारी सी. जी. थोरात व वनरक्षक अतुल हजारे हेदेखील उपस्थित होते.
घटनास्थळावर अवैध उत्खननासाठी वापरण्यात आलेले जेसीबी व दोन ट्रॅक्टर ट्राली थोरात यांनी भाड्याने आणल्याच्या बाबीला वनरक्षक हजारे यांनी दुजोरा दिला. अवैध उत्खनन करण्यात आलेल्या स्थळावर ट्रॅक्टर ट्राली व जेसीबी मशीन असतानाही ते जप्त करण्यात आले नाही. उलट कोणतीही कारवाई न करता ते सोडून देण्यात आले. या उत्खननामुळे आरक्षित कक्ष क्रमांक २८ मध्ये वयोमर्यादा अपूर्ण असलेले अनेक झाडांची मूळे बाहेर पडली आहेत. दोन मीटर चौरस खड्ड्यात खोदकाम करण्यात आले आहे. राखीव जंगलात हे खोदकाम झाले असल्यामुळे पावसाळ्यात वादळाने वृक्ष कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी तत्काळ आलापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी अग्रवाल यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. आत्राम यांना दिले आहेत.