शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

जमीन खरेदी-विक्रीचे प्रस्ताव प्रलंबित

By admin | Updated: September 24, 2015 01:44 IST

जिल्ह्यातील दोन नगर पालिका व १० नगर पंचायतीच्या हद्दीलगत असलेल्या ग्राम पंचायत क्षेत्रातील जमीन खरेदी-विक्रीचे अधिकार ...

अडचण : ग्रा. पं. कडील अधिकार पालिका व नगर पंचायतीकडेगडचिरोली : जिल्ह्यातील दोन नगर पालिका व १० नगर पंचायतीच्या हद्दीलगत असलेल्या ग्राम पंचायत क्षेत्रातील जमीन खरेदी-विक्रीचे अधिकार आता नगर पालिकेचे मुख्याधिकारी व नगर पंचायतीच्या प्रशासकांकडे देण्यात आले आहे. पूर्वी हे अधिकार ग्राम पंचायत प्रशासनाला होते. मात्र अंमलबजावणी यंत्रणा बदलविल्यामुळे शहरालगतच्या गावातील नागरिकांनाही याचा फटका बसत आहे. शहरालगतच्या नवेगाव (मुरखळा), आष्टी, आलापल्ली व इतर शहरालगतच्या गावातील अनेक जमीन विक्रीचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे या गावातील नागरिक शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून त्रस्त झाले आहेत.गडचिरोली शहरालगत कॉम्प्लेक्स परिसराला लागून नवेगाव (मुरखळा) ग्राम पंचायतीची हद्द सुरू होते. या भागात पूर्वी प्लॉटकरिता जमीन खरेदी-विक्री केल्यानंतर ग्राम पंचायतकडे नोंद केल्यावर घर बांधकामासाठी परवानगी सहजपणे मिळत होती. परंतु राज्य शासनाच्या निर्णयामुळे १ एप्रिलपासून आता नवेगाव (मुरखळा) भागातीलही घर बांधकामाच्या परवानगीचे दीडशेवर अधिक प्रस्ताव नगर परिषदकडे प्रलंबित आहे, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली आहे. नगर परिषद हे प्रस्ताव निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविते. हे प्रस्ताव तयार करण्यासाठी नव्या नियमामुळे प्रचंड मोठ्या स्वरूपात कागदपत्रांची मागणी वाढली आहे. तसेच नगर रचना विभागाकडे दोन ते अडीच टक्के विकास कराचा भरणाही नागरिकांना भरावा लागत आहे. ग्राम पंचायतीचे अधिकार काढल्यानंतर प्लॉटधारकाला मोठा आर्थिक भूर्दंड घर बांधकामाच्या परवानगीसाठी सोसावा लागत आहे. मागील सहा महिन्यांपासून या भागातील एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे अनेक जणांचे घर बांधकाम रखडून पडलेले आहे. नवेगाव ग्राम पंचायतीने आपले अधिकार काढून घेऊ नये, असा ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना विचारणा केली असता, किती प्रस्ताव प्रलंबित आहे, हे मुख्याधिकारी, प्रशासकांना विचारून सांगतो, असे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)