कार अपघातात प्राध्यापक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:00:42+5:30
प्रा.घोनमोडे हे कामानिमित्त एमएच ३३-१६१४ क्रमांकाच्या कारने गडचिरोली येथे गेले होते. काम आटोपून ते आरमोरीकडे परत येत होते. दरम्यान देऊळगावजवळच्या वळणावर भरधाव कारचा टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या सीजी ०७, बीक्यू ७७३५ या क्रमांकाच्या ट्रकवर जाऊन धडकली. कारची धडक एवढी जबर होती की, कारच्या इंजीनचा भाग चकनाचूर झाला.

कार अपघातात प्राध्यापक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : धावत्या कारचा टायर फुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला जबर धडक बसून झालेल्या अपघातात प्रा.राजेंद्र विठ्ठलराव घोनमोडे (५०) हे ठार झाले. ते स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून सुपरिचित होते. हा अपघात मंगळवारी दुपारी १ वाजता देऊळगावजवळ घडला.
प्रा.घोनमोडे हे कामानिमित्त एमएच ३३-१६१४ क्रमांकाच्या कारने गडचिरोली येथे गेले होते. काम आटोपून ते आरमोरीकडे परत येत होते. दरम्यान देऊळगावजवळच्या वळणावर भरधाव कारचा टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या सीजी ०७, बीक्यू ७७३५ या क्रमांकाच्या ट्रकवर जाऊन धडकली. कारची धडक एवढी जबर होती की, कारच्या इंजीनचा भाग चकनाचूर झाला.
तसेच घोनमोडे हे जागीच ठार झाले. सब्बलच्या सहाय्याने कारचा दरवाजा काढल्यानंतर घोनमोडे यांचा मृतदेह बाहेर निघाला. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे आरमोरीसह जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे.