कारागृहात धान व भाजीपाल्याचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:33 PM2017-08-26T23:33:54+5:302017-08-26T23:34:08+5:30

येथील कोटगल परिसरात असलेल्या खुल्या कारागृहातील कैद्यांना विविध प्रकारच्या पीक लागवडीचे धडे दिले जात आहे. कारागृहाच्या परिसरात यावर्षी विविध प्रकारचा भाजीपाला व धानाचे उत्पादन घेतले जात आहे.

Production of paddy and vegetables in jail | कारागृहात धान व भाजीपाल्याचे उत्पादन

कारागृहात धान व भाजीपाल्याचे उत्पादन

Next
ठळक मुद्देस्तुत्य उपक्रम : गडचिरोलीच्या खुल्या कारागृहातील कैद्यांना पीक लागवडीचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील कोटगल परिसरात असलेल्या खुल्या कारागृहातील कैद्यांना विविध प्रकारच्या पीक लागवडीचे धडे दिले जात आहे. कारागृहाच्या परिसरात यावर्षी विविध प्रकारचा भाजीपाला व धानाचे उत्पादन घेतले जात आहे. या पिकांची देखभाल येथील कैदी करीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सन २०१५ मध्ये गडचिरोली येथे खुल्या कारागृहाची निर्मिती झाली. १७ हेक्टर आर जागेत वसलेल्या कारागृहाची जागा शेत लागवडीसाठी उपयुक्त आहे. या कारणामुळेच कारागृह प्रशासनाचे परिसरात पहिल्यांदा भाजीपाल्याचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कारागृह परिसरात तलाव निर्माण करून मच्छी पालनाचा निर्णय घेण्यात आला. कारागृहाच्या परिसरात यावर्षी एक एकर क्षेत्रात धान व दोन एकर क्षेत्रात भेंडी, वांगे, कोहळा व इतर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. या पिकांची देखरेख करण्याची जबाबदारी कैद्यांवर सोपविण्यात आली आहे. सद्य:स्थितीत या कारागृहात ६४ कैदी शिक्षा भोगत आहे. येत्या काही दिवसात येथील बहुतांश कैदी मुक्त होतील. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर येथून घेतलेल्या प्रशिक्षणाचा या कैद्यांना उर्वरित जीवनात लाभ होणार आहे. त्यासाठीच त्यांना विविध पिकांच्या लागवडीचे प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक डी. एस. आडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. कैद्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.

नागपूर व चंद्रपूरला भाजीपाला रवाना
शासनाच्या आदेशानुसार येथील कैद्यांना रोजगाराचा प्रशिक्षण दिले जात आहे. कारागृह परिसरात एक एकर जागेत भेंडीची लागवड करण्यात आली आहे. सदर भेंडी नागपूर व चंद्रपूर कारागृहात पाठविली जात आहे. गतवर्षी भेंडी विक्रीतून तीन लाख रूपये मिळाले होते.

Web Title: Production of paddy and vegetables in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.