शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
4
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
5
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
6
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
7
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
8
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
9
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
10
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
11
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
14
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
15
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
16
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
17
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
18
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
19
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
20
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यांची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रबोधन

By admin | Updated: July 9, 2015 01:53 IST

राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस यंत्रणेकडे आहे.

गडचिरोलीत कार्यक्रम : श्याम मानव यांनी केले मार्गदर्शन
गडचिरोली : राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस यंत्रणेकडे आहे. मात्र यंत्रणेतही अनेकजण अंधश्रद्धेच्या आहारी असल्याचे दिसून आले आहे. अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला यासंदर्भात योग्य माहिती व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने राज्यभर ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व जादुटोणाविरोधी कायदा’ या विषयावर दक्षता अधिकारी व पोलिसांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याचा एक भाग म्हणून गडचिरोली येथे मंगळवारी जिल्हा पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी पोलीस अधिकाऱ्यांना या कायद्याबाबतची संपूर्ण माहिती दिली.
जादुटोणाविरोधी कायदा राज्यभर निट वापरला जावा, यासाठी पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पीआयएमसीचे राज्य समन्वयक प्रवीण गांगुर्डे हे ही उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. हा कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जादुटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती महाराष्ट्र शासन, समाजकल्याण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. श्याम मानव यांनी समाजावर अंधद्धेचा पगडा आहे. पोलीस हे देखील समाजाचाच एक घटक असल्यामुळे त्यांच्यातील अनेकांवर पगडा असल्याचे दिसून येते. त्यांच्या अंधश्रद्धा दूर झाल्या व त्यांना कायद्याची सखोल माहिती मिळाल्यास जादुटोणाविरोधी कायद्याची चांगली अंमलबजावणी होईल, असे प्रतिपादन केले. (जिल्हा प्रतिनिधी)