शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपाची वीज जोडणी नादुरूस्त

By admin | Updated: October 11, 2014 23:09 IST

यंदाच्या पूर परिस्थितीमुळे मालेवाडा- सिंदेवाही- चरवीदंड अशी कृषी पंपाची वीज वाहीनी प्रशासनाच्यावतीने जोडण्यात आली होती. मात्र यंदा झालेल्या पूर परिस्थितीमुळे या वीज वाहिनीतील खांब

मालेवाडा : यंदाच्या पूर परिस्थितीमुळे मालेवाडा- सिंदेवाही- चरवीदंड अशी कृषी पंपाची वीज वाहीनी प्रशासनाच्यावतीने जोडण्यात आली होती. मात्र यंदा झालेल्या पूर परिस्थितीमुळे या वीज वाहिनीतील खांब मोडून पडले आहेत. तर काही खांब पूरात वाहून गेले. या ठिकाणी तुटलेले खांबही शिल्लक राहिले नसल्यामुळे तात्पूरती दुरूस्तीही अशक्य आहे. पुरामुळे ही कृषी पंपाची वीज वाहीनी पूर्णत: क्षतीग्रस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना धानपिकाला पाणी देण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. परिणामी मालेवाडा परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. गतवर्षी मालेवाडा परिसरासह संपूर्ण जिल्हाभरात संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शेकडो हेक्टर शेतीतील धानपिक पुरात वाहून गेले होते. अनेक घरांची पडझडही झाली होती. मालेवाडा परिसरात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मालेवाडा- सिंदेवाही- चरवीदंड ही कृषी पंपाची वीज वाहिनी गतवर्षी पुरामध्ये वाहून गेली होती. यामुळे शेतकऱ्यांपुढे सिंचनाची मोठी समस्या निर्माण झाली असल्याची बाब महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मालेवाडा परिसरातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेऊन या कृषी वीज वाहीनीची तात्पूरती पुन्हा जोडणी केली होती. या कृषी वीज वाहिनीच्या दुरूस्तीसाठी कंत्राटदार मिळत नव्हता. यामध्ये चार महिने लोटून गेले. त्यानंतर मालेवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी सध्या श्रमदानातून तुटलेले खांब परिसरातून गोळा करून ही कृषी वीज वाहिनी उभी केली होती. मात्र यावर्षीच्या पावसाळ्यात पुरामुळे पुन्हा ही कृषी वीज वाहिनी पूर्णत: क्षतिग्रस्त झाली आहे. सदर कृषी वीज वाहीनीची दुरूस्ती करून शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही तर शेतकऱ्यांच्या तोंडापुढे आलेला घास हिरावल्या जाणार आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)