झटपट नोकरीसाठी पॉलिटेक्निक; विद्यार्थ्यांचा ओढा 'कॉम्प्युटर'कडे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 15:40 IST2024-07-04T15:38:45+5:302024-07-04T15:40:01+5:30
मुदतवाढीमुळे नोंदणी वाढली : पाच वर्षांत सहाशेवर विद्यार्थ्यांना रोजगार

Polytechnic for quick employment; Students' attraction to 'computer'!
न्यूज अपडेटस्
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. अशावेळी मुलांनी कोणते शिक्षण घ्यावे, असा प्रश्न पालकांसमोर असतो. इयत्ता दहावी व बारावीनंतर अनेक विद्यार्थी पदवीचे शिक्षण न घेता पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतात. मागील पाच वर्षांत गडचिरोली येथे पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या सहाशेवर विद्यार्थ्यांना नोकरी प्राप्त झालेली आहे.
गडचिरोलीतील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आठ वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाकडील ओढा कमी झाला होता; परंतु शासकीय तंत्रनिकेतनने 'स्कूल कनेक्ट' प्रोग्राम शाळांमध्ये राबवून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सध्या विद्यार्थ्यांचा ओढा संगणक शाखेकडे सर्वाधिक आहे.
२१० जागांसाठी ६१५ विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
गडचिरोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एकूण २१० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. एकूण चार शाखांसाठी आतापर्यंत ६१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. नोंदणीचा आकडा पुन्हा वाढू शकतो.
जुलैपर्यंत करता ९ चारयज
पॉलिटेक्निक अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज सादर करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) कडून मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना ९
जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
अंतिम यादीनंतर प्रवेश निश्चित
कागदपत्रे पडताळणी, अर्ज निश्चितीची प्रक्रिया यादरम्यान पूर्ण करता येणार आहे. 'कॅप'साठी पर्याय अर्ज भरणे, कॅप जागावाटप, जागा स्वीकृती करणे, उमेदवारांचे वाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे, अंतिम गुणवत्ता यादीनंतर जाहीर केला जाणार आहे.
१६ जुलैला अंतिम यादी
विद्यार्थ्यांना ९ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. कागदपत्र पडताळणी व अर्ज निश्चिती होईल. तात्पुरती गुणवत्ता यादी ११ जुलैला प्रसिद्ध होईल. आक्षेप पडताळणी- नंतर तसेच १६ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
कोणत्या शाखेच्या किती जागा?
शाखा जागा
संगणक ३०
सिव्हील ६०
इलेक्ट्रिकल ६०
मेकॅनिकल ६०
एकूण २१०
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना हमखास प्लेसमेंट मिळून रोजगाराची संधी उपलब्ध होते. दर्जेदार व उपयोगी शिक्षण व स्कूल कनेक्ट कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ओढा तंत्रशिक्षणाकडे वाढलेला आहे. - डॉ. अतुल बोराडे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन