शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मनस्ताप

By admin | Updated: October 18, 2014 01:27 IST

कुरखेडा, कोरची, धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातून पायपीट करीत बेसकॅम्पवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी...

देसाईगंज/मोहटोला : कुरखेडा, कोरची, धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातून पायपीट करीत बेसकॅम्पवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी देसाईगंजपर्यंत वाहनाने सोडून देण्यास नकार दिल्याने प्रचंड मनस्ताप सहन करीत तब्बल दोन दिवसानंतर देसाईगंज येथे पोहोचता आले, असा आरोप निवडणूक कर्मचाऱ्यांनी केला आहे. निवडणूक आटोपल्यानंतर नियोजनाप्रमाणे पोलिसांनी सावरगाव मतदान केंद्र गाठले. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राधिकारी यांच्यासह चार कर्मचारी कार्यरत होते. मात्र पोलिसांनी ईव्हीएम मशीन व केवळ मतदान केंद्राधिकारी यांनाच देसाईगंज येथे पोहोचविले. इतर तीन कर्मचारी सावरगाव येथेच दोन दिवसांपासून अडकून पडले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदर कर्मचाऱ्यांचा फोन आऊट आॅफ कव्हरेज दाखवत होता. तर जो मतदान केंद्राधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन आला होता, त्याच्याकडे निवडणुकीसंदर्भातील इतर कागदपत्रे व लिफाफे नसल्याने ईव्हीएम मशिनचा ताबा घेण्यास देसाईगंज येथील स्ट्राँग रूमच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे सदर अधिकारी सकाळी ११ वाजेपासून त्याच्या इतर साथीदारांची वाट बघत स्ट्राँगरूमच्या बाहेर दिवसभर ताटकळत बसला होता. सायंकाळी पोलिसांनी सावरगावचे लिफाफे देसाईगंज येथे आणले. मात्र कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता. मालेवाडा व सुरसुंडी या बेस कॅम्पअंतर्गत असलेल्या १७ मतदान केंद्रावर ६८ कर्मचाऱ्यांनी निडणुकीची जबादारी पार पाडली. या सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावरून मतदान पार पाडल्यानंतर पोलीस संरक्षणात पायीच बेस कॅम्पवर आणण्यात आले. त्यानंतर १६ आॅक्टोबरच्या पहाटे मालेवाडा व सुरसुंंडी येथे हेलिकॉप्टर पाठवून या ठिकाणच्या १७ मतदान केंद्राधिकारी व ईव्हीएम मशीन आणण्यात आल्या. मतदान केंद्राधिकाऱ्यांनी निवडणुकीचे दस्ताऐवज सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यालाही विरोध केला. सदर केंद्राधिकारी देसाईगंज येथे पोहोचल्यानंतर याही कर्मचाऱ्यांना इतर दस्ताऐवज दिल्याशिवाय ईव्हीएम मशीन ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनाही ताटकळत राहावे लागले. कोटगुल, ग्यारापती बेस कॅम्पअंतर्गत येत असलेल्या निवडणुक कर्मचाऱ्यांची हिच स्थिती झाली. बेसकॅम्पवर १५ आॅक्टोबरपासून अडकुन पडलेल्या कर्मचाऱ्यांनी देसाईगंज येथे पोहोचवून देण्यासाठी पोलिसांना विनंती केली असता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणताही आदेश नसल्याने पोहोचवून देणार नाही, असे बजाविले. त्यामुळे बेस कॅम्पवरच्या शेकडो कर्मचाऱ्यांना दोन दिवसानंतर जीव धोक्यात घालून मिळेल त्या साधनाने देसाईगंज येथे पोहोचावे लागले. पोलिसांच्या या हेकेखोरीमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला असल्याने पोलिसांविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निवडणूक विभागाने बेस कॅम्प तयार केले असले तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे संपर्क केला असता, कुणीही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाही. देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी भांबावलेल्या स्थितीत होते. ते कुठलीही माहिती देण्यास तयार नव्हते. त्यामुळे प्रशासनाकडून या संदर्भात कुणाचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. (नगर प्रतिनिधी)