शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

घर जळालेल्या कुटुंबाला पोलिसांची मदत

By admin | Updated: April 4, 2017 00:49 IST

उपपोलीस स्टेशन दामरंचा हद्दितील नैनगुड्डम येथील वसंत सोनू शेगम यांच्या राहत्या घराला २७ मार्च रोजी अचानक आग लागली.

दामरंचा उपपोलीस स्टेशनचा उपक्रम : वसंत शेगम यांच्या कुटुंबाला दिले जीवनोपयोगी साहित्यजिमलगट्टा : उपपोलीस स्टेशन दामरंचा हद्दितील नैनगुड्डम येथील वसंत सोनू शेगम यांच्या राहत्या घराला २७ मार्च रोजी अचानक आग लागली. या आगीत शेगम यांचे घर जळून खाक झाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले होते. दामरंचा उपपोलीस स्टेशनच्या वतीने शेगम कुटुंबाला जीवनोपयोगी साहित्य देऊन मदत केली. नैनगुडम येथील वसंत सोनू शेगम यांच्या घराला २७ मार्च रोजी अचानक आग लागली. या आगीत शेगम यांचे घर जळून खाक झाले. त्याचबरोबर कपडे, भांडी, अन्नधान्य जळाल्याने वसंत शेगम यांच्या कुटुंबासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शेगम यांच्या कुटुंबात त्यांची लहान पाच मुलींचा समावेश आहे. ही बाब दामरंचा पोलीस स्टेशनला माहित झाल्यानंतर जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनात उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक विलास मोरे, पोलीस उपनिरिक्षक अनिल लवटे, अभिजीत भोसले, नागनाथ पाटील, गणेश मोरे व उपपोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत गोळा केली. यातून कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी कपडे, संसार उपयोगी भांडे, किराणा सामान खरेदी करून दिले. पोलिसांच्या या कार्याचे गावातील नागरिकांनी कौतुक केले आहे. पोलिसांची मदत बघून शेगम कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकायला सुरूवात झाली. या उपक्रमातून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रिदवाक्य प्रत्यक्षात उतरले.