शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

श्याम सुकाजी मानकर (५०) असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे. सावली तालुक्यातील निफंद्रा येथील एका शेतकऱ्याची शेती गडचिरोली येथे आहे. या शेतीवर दुसऱ्या व्यक्तीने कब्जा केला आहे. हा कब्जा काढावा यासाठी सदर व्यक्तीने गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी मानकर याने तक्रारकर्त्याला ३ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.

ठळक मुद्देशेतकऱ्याकडून मागितली लाच : गडचिरोली ठाण्यातील कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतीच्या कब्जाबाबत दिलेल्या रिपोर्टचा निपटारा करण्याच्या कामासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाºया गडचिरोली पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली.श्याम सुकाजी मानकर (५०) असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे. सावली तालुक्यातील निफंद्रा येथील एका शेतकऱ्याची शेती गडचिरोली येथे आहे. या शेतीवर दुसऱ्या व्यक्तीने कब्जा केला आहे. हा कब्जा काढावा यासाठी सदर व्यक्तीने गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी मानकर याने तक्रारकर्त्याला ३ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. ती लाच स्वीकारताना मानकरला शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली. सदर कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस निरिक्षक यशवंत राऊत, रवी राजुलवार, एएसआय मोरेश्वर लाकडे, प्रमोद ढोरे, सतीश पत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकर, किशोर ठाकूर, गणेश वासेकर, तुळशीराम नवघडे, घनश्याम वडेट्टीवार यांनी केली.लाच स्वीकारताच काढला पळश्याम मानकर याने संबंधित शेतकऱ्याकडून आरमोरी मार्गावरील गोगाव फाट्याजवळ लाच स्वीकारली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला असल्याचे लक्षात आल्यानंतर मानकर याने गडचिरोलीच्या दिशेने दुचाकीने पळ काढला. गडचिरोली शहरात न येता वन विभागाच्या नाक्यावरून खरपुंडी मार्गाकडे दुचाकी वळविली. डम्पिंग यार्ड ओलांडून असलेल्या नाल्याजवळ त्याची दुचाकी घसरून तो जमिनीवर पडला. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याला पकडून जिल्हा रूग्णालयात भरती केले.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस