शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

'पीएम किसान'चा हप्ता आला; तुम्हाला मेसेज मिळाला का नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:07 IST

Gadchiroli : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतीक्षित २२ वा हप्ता अखेर १३ मार्च रोजी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. जिल्ह्यात देखील या योजनेंतर्गत दीड लाखांवर शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतीक्षित २२ वा हप्ता अखेर १३ मार्च रोजी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. जिल्ह्यात देखील या योजनेंतर्गत दीड लाखांवर शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी, आधार सीडिंग आणि जमीन अभिलेखांच्या नोंदींमधील त्रुटींमुळे लाभार्थी संख्येत मोठी घट पाहायला मिळाली होती. मात्र, प्रशासकीय स्तरावर झालेल्या दुरुस्तीनंतर या हप्त्यात लाभार्थ्यांच्या संख्येत नेमकी किती वाढ किंवा घट झाली, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुरूस्ती करताना अनेक अडचणी येत आहेत.

यावेळी लाभार्थी वाढले की कमी झाले ?

२१ व्या हप्त्याच्या तुलनेत २२ व्या हप्त्यात जिल्ह्यानिहाय संख्येत बदल दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील दोन महिन्यांत प्रलंबित केवायसी पूर्ण केली, अशा नवीन लाभार्थ्यांची भर पडली आहे. मात्र, अपात्र ठरलेले आणि 'अॅग्रीस्टॅक'मध्ये माहिती नसलेले शेतकरी अद्यापही प्रवाहाबाहेरच आहेत.

'पीएम किसान'चा २२ वा हप्ता वितरीत

केंद्र सरकारने होळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांचा हप्ता जमा केला आहे.डीबीटी प्रणालीद्वारे थेट बैंक २ खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली असून, यामुळे रब्बी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळाले आहे.

'अॅग्रीस्टॅक' नसणाऱ्यांवर आहे टांगती तलवार !

  • यंदा सरकारने 'अॅग्रीस्टॅक' प्रणालीवर भर दिला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा नकाशा आणि डिजिटल सातबारा या प्रणालीशी लिंक नाही, अशा अनेक पात्र शेतकऱ्यांचा हप्ता तांत्रिक कारणास्तव रखडल्याचे समोर आले आहे.
  • १३ मार्च रोजी हप्ता जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये 'उशिरा का?' अशी चर्चा होती. प्रामुख्याने लाभार्थी यादीचे शुद्धीकरण, बोगस लाभार्थी शोधण्याची मोहीम आणि नवीन 'अॅग्रीस्टॅक' प्रणालीमध्ये डेटा संकलित करण्याच्या प्रक्रियेमुळे या हप्त्याला विलंब झाला.

लाभार्थी यादी नेमकी कशी तपासावी ?

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर हप्त्याची संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही पात्र असूनही खात्यात पैसे आले नसतील, तर ई-केवायसी पुन्हा तपासा.

ई-केवायसी आणि आधार लिंकचा पेच वाढला

अद्यापही अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी 'सीडिंग' केलेले नाही. केवळ बँक खात्याला आधार जोडणे पुरेसे नसून ते डीबीटीसाठी 'मॅप' असणे अनिवार्य आहे. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांना पात्र असूनही हप्ता मिळालेला नाही.

"ज्या पात्र शेतकऱ्यांची ई- केवायसी किंवा आधार लिंक प्रक्रिया अपूर्ण होती, त्यांनी ती पूर्ण केल्यामुळे अनेकांना पुन्हा लाभ सुरू झाला आहे. मात्र, ज्यांचे पेमेंट रखडले आहे त्यांनी त्वरित आपल्या बँक खात्याचे आधार सीडिंग तपासावे."- प्रीती हिरळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

English
हिंदी सारांश
Web Title : PM Kisan Installment Arrived: Did You Receive the Message?

Web Summary : The 22nd installment of PM Kisan Samman Nidhi Yojana is released. Over 1.5 lakh farmers in Gadchiroli benefited. E-KYC and land record issues caused delays. Check your status and complete pending procedures to receive benefits.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना