शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST

मंगळवार, दि.२६ ला सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानात झाला. यावेळी ना. यड्रावकर यांनी नक्षलवाद्यांचा ...

मंगळवार, दि.२६ ला सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानात झाला. यावेळी ना. यड्रावकर यांनी

नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, इतर पदाधिकारी व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

ध्वजारोहण पथसंचलनाचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांनी केले.

यावेळी ना. यड्रावकर म्हणाले, आकांक्षित जिल्हा म्हणून देशातील ११५ जिल्ह्यांत गडचिरोली मोडतो. निती आयोगाने या जिल्ह्यातील कामकाजांचे मूल्यांकन करून कामांच्या प्रगतीत तिसरा क्रमांक दिला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अभिमानाचे स्थान आहे. येथील वनसंपत्ती, खनिजे, आदिवासी संस्कृती, त्यांच्या रीती व परंपरा विशेष असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन निवृत्त क्रीडा अधिकारी मदन टापरे, शिक्षक ओमप्रकाश संग्रामे व नितेश झाडे यांनी केले. आभार निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम. तळपाडे यांनी मानले.

(बॉक्स)

जिल्ह्यात सर्वांत कमी मृत्यूदर

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस व प्रशासनातील लोक मेहनत करून संसर्गाला रोखण्यासाठी योगदान देत आहेत. जनतेने केलेल्या सहकार्यामुळे कोरोनाला रोखण्यात मदत झाली. यापुढेही अशीच मदत सर्वांकडून अपेक्षित आहे. राज्यात सर्वांत कमी कोरोनाचे रुग्ण या जिल्ह्यात असून, सर्वांत कमी मृत्यूदरही आहे.

उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेकांचा सत्कार

- यावेळी विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. त्यात शौर्यपदक मिळालेले पीएसआय नागनाथ गुरुसिद्ध पाटील, नायक महादेव मारुती मडावी, कमलेश अशोक अर्का, शिपाई हेमंत कोरके मडावी, अमुल श्रीराम जगताप, वेल्ला कोरके आत्राम, सुधाकर मलय्या मोगलीवार, बियेश्वर विष्णू गेडाम यांचा सन्मान करण्यात आला, तसेच नायक गिरीश मारुती ढेकले, नीलेश मारुती ढुमणे यांचाही सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती सेवा पदकप्राप्त गुप्तवार्ता अधिकारी राजू इरपा उसेंडी यांनाही सन्मान मिळाला.

- प्रशासनातील उत्कृष्ट कामाकरिता अपर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, उपजिल्हाधिकारी निवडणूक कल्पना नीळ (ठुबे), जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, पीएम फेलो सुधाकर गवंडगवे, उदित अग्रवाल, महसूल सहायक गणेश गेडाम, अव्वल कारकून किशोर मडावी, वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण धानोरा आर.एच. चौधरी, क्षेत्र सहायक कुनघाडा वनपरिक्षेत्र एस.एम. मडावी, तसेच महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई चढून सर केल्याबद्दल करिश्मा नरेंद्र मल (माहेश्वरी) हिचाही सत्कार करण्यात आला.