शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्राेल महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 5:00 AM

पेट्राेल व डिझेलचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना चैनीच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे विमानाचे इंधन चाळीस टक्क्यांनी स्वस्त आहे. पेट्रोल-डिझेलवर लावले जाणारे विविध कर विमानाच्या इंधनावर लावले जात नाहीत. त्यामुळे विमानाचे इंधन ट्रकसारख्या वाहनांसाठी लागणाऱ्या डिझेलच्या किमतीपेक्षा स्वस्त आहे. 

ठळक मुद्देवाहन चालविणे कसे परवडणार?, पेट्राेल १०८.५० रुपये तर एटीएफ ६६.०६ रुपये

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दैनंदिन वाहतुकीसाठी वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीपेक्षा आकाशात भरारी घेण्यासाठी विमानात वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन इंधनाचे (एटीएफ) भाव कमी आहेत, असे सांगितले तर कुणालाही विश्वास बसणार नाही ! पण हे खरे आहे.पेट्राेल व डिझेलचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना चैनीच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे विमानाचे इंधन चाळीस टक्क्यांनी स्वस्त आहे. पेट्रोल-डिझेलवर लावले जाणारे विविध कर विमानाच्या इंधनावर लावले जात नाहीत. त्यामुळे विमानाचे इंधन ट्रकसारख्या वाहनांसाठी लागणाऱ्या डिझेलच्या किमतीपेक्षा स्वस्त आहे. गडचिराेलीत पेट्रोलचा भाव प्रतिलीटर १०८.५० रुपये, तर डिझेलचा भाव प्रतिलीटर ९६.६६ रुपयांच्या घरात आहे. विमानासाठी लागणाऱ्या एटीएफ इंधनाचा भाव मात्र प्रतिलीटर ६६.०६ रुपये आहे. विमानाला लागणाऱ्या इंधनावर केंद्र सरकारचे कर अत्यंत कमी आहेत. पेट्रोल आणि डिझेलवर लागू असलेला ‘सेस’ (उपकर) विमानाच्या इंधनावर नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी लाेकमतला सांगितले. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेला कृषी अधिभारही विमानाच्या इंधनावर लावण्यात आलेला नाही. त्यामुळे डिझेलच्या प्रतिलीटर किमतीपेक्षा विमानाचे प्रतिलीटर इंधन सुमारे ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याचे दिसून येते. विमानाचे इंधन अतिशय ज्वलनशील राहते. त्यामुळे त्याचा दर पेट्राेलपेक्षा अधिक असावा, असा समज हाेता. मात्र शासनाकडून करामध्ये सूट दिल्याने विमानाच्या इंधनाचा दर पेट्राेलपेक्षाही कमी आहे.

पगार कमी, खर्चात वाढकाेराेनामुळे कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यामुळे काही कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. काही माेजक्याच कामगारांना कामावर ठेवण्यात आले आहे. त्यातच मजुरीतही कपात केली आहे. पूर्वी दिवसाला ४०० रुपये मजुरी मिळत हाेती. आता केवळ ३५० रुपये दिले जातात. काेराेनाच्या कालावधीत महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ये-जा करण्याचा खर्चही वाढला आहे.  - संदीप डाेईजड, वाहनधारक

स्वत:च्या वाहनामुळे प्रवासाचा खर्च वाढलापूर्वी बहुतांश नागरिक सार्वजनिक वाहनांचाच वापर करीत हाेते. गडचिराेली शहरातील बहुतांश नागरिक विविध कामांसाठी नागपूर किंवा चंद्रपूर येथे जातात. काेराेनाच्या पूर्वी एसटी बस किंवा खासगी बसनेच जात हाेते. मात्र, आता या  वाहनातून प्रवास केल्यास काेराेना संसर्गाची भीती असल्याने नागरिक स्वत:चे चारचाकी वाहन घेऊन जातात किंवा स्वतंत्र चारचाकी वाहन भाड्याने घेतात. एसटी बसने दाेन जणांना नागपूरला जाऊन परत येण्याचा खर्च केवळ एक हजार रुपये येते. आता स्वतंत्र वाहनासाठी पाच हजार रुपये माेजावे लागतात. काही जणांनी तर काेराेनाच्या भितीने चारचाकी वाहने खरेदी केली आहेत.

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल