शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

मार्र्कं ड्यात उसळला जनसागर

By admin | Updated: July 28, 2014 23:32 IST

श्रावण महिन्याला २७ जुलैपासून प्रारंभ झाला असून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र मार्कंडादेव येथे शनिवारी पवित्र श्रावण मास पर्वकाळाची महापूजनाने सुरूवात करण्यात आली.

चामोर्शी : श्रावण महिन्याला २७ जुलैपासून प्रारंभ झाला असून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र मार्कंडादेव येथे शनिवारी पवित्र श्रावण मास पर्वकाळाची महापूजनाने सुरूवात करण्यात आली. भगवान महामुनी मार्र्कंडेश्वराच्या मुख्य मंदिरात महामृत्यूंजय मार्र्कंडेश्वरास सहस्त्र बिल्वार्चनाने अभिषेक व धार्मिक विधी सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत करण्यात आला. गडचिरोलीसह इतर जिल्ह्यातील शिवभक्तांचा जनसागर मंदिरात दर्शनासाठी उसळला होता. सोमवारी सकाळी श्रावण मास महाअभिषेक बिल्वार्चन महापूजा जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार, पंकज पांडे, शुभांगी पांडे, अशोक गावडे, अश्विनी गावडे यांच्या हस्ते करण्यात आली. संपूर्ण श्रावण महिनाभर मनोज हेजीब, उज्ज्वला हेबीज हे सपत्नीक पूजा करणार आहेत. सकाळी ६.३० वाजतापासून मार्कंडा येथे जिल्ह्यासह इतर भागातील भाविकांनी भगवान शंकर व महामुनी मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे मार्कंडा देवस्थानातील वातावरण नादमय झाले होते. श्रावण मासात दररोज पहाटेपासूनच मंदिरात पूजाअर्चा केली जाणार आहे. त्यामुळे दररोज भाविकांचा महासागर उसळण्याची शक्यता आहे. यासाठी मंदिर समिती ट्रस्टच्यावतीने खास व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली आहे.देवस्थान परिसरात दुर्गंधी पसरू नये, यासाठी मंदिर समितीच्यावतीने लक्ष ठेवल्या जात आहे. त्यामुळे श्रावण मासभर मार्र्कंडा येथील वातावरण भक्तिमय राहणार आहे. मंदिरात महाअभिषेक पूजा लोमेश महाराज जंदालवार, रामु महाराज गायकवाड, आनंदराव महाराज जंदालवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मार्र्कंडादेवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, माजी खा. मारोतराव कोवासे, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामुजी तिवाडे, कोषाध्यक्ष पा. गो. पाडे, विश्वस्त हरीभाऊ खिनखिनकर, व्यवस्थापक जनार्धन जुनघरे, उज्वल गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. श्रावण पर्वकाळात भगवान शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने मार्र्कंडा देवस्थानाकडे दाखल होत आहेत. हर हर महादेव या घोषणेसह भाविकांचे जत्थे मार्र्कंडात भगवान शंकराच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे मार्र्कंडात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्तही करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)