शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गॅस वितरणाचा पसारा रस्त्यावर

By admin | Updated: September 2, 2016 01:23 IST

रेल्वे मार्ग असल्याने देसाईगंज शहराची दोन भागात विभागणी झाली आहे. रेल्वे विभागाच्या वतीने नवीन मार्ग निर्मिती,

वाहतूक प्रभावित : राजीव गांधी चौक अतिक्रमणाच्या विळख्यातदेसाईगंज : रेल्वे मार्ग असल्याने देसाईगंज शहराची दोन भागात विभागणी झाली आहे. रेल्वे विभागाच्या वतीने नवीन मार्ग निर्मिती, प्लेटफार्म तयार करणे व इतर कामे सुरू आहे. त्यामुळे उडाणपुलावरूच आवागमन करावे लागते. उडाण पुलावरील सर्व नागरिक राजीव गांधी चौकात असतात. मात्र येथे गॅस वितरण कार्यालय असल्याने सिलिंडरने भरलेले वाहन व गॅससाठी येणाऱ्या ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. खासगी ट्रॅव्हल्स व आॅटोचे थांबे येथेच असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. शहराच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या अलिकडील भागात देसाईगंज शहराची लोकसंख्या वाढत आहे. ब्रह्मपुरी मार्गावर राजीव गांधी चौकापासून उडाणपुलावर चढण्याचा मार्ग सुरू आहे. पादचारी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, रेल्वे प्रवाशी यांना पायी ये-जा करण्यासाठी एकच रस्ता असून तो वर्दळीचा आहे. मात्र येथील गॅस एजन्सीने आपल्या गॅस वितरणाचा संपूर्ण पसारा रस्त्यावरच चालविला आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होते. ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या आॅटो, नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा येथेच थांबा असल्याने वाहनांची प्रचंड गर्दी राहते. अशा गर्दीतून उडाणपुलावरून येणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होत आहे. गॅस वितणाचे ठिकाण बदलविण्यात यावे, तसेच खासगी ट्रॅव्हल्स व आॅटोचे थांबे येथून इतरत्र हलवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)