चामोर्शी शहरातील चौका-चौकात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत. मोकाट जनावरे, कुत्री, डुक्कर सुद्धा गल्लोगल्ली फिरत असतात. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरवासीयांकडून सातत्त्याने करण्यात येते. मात्र सदर समस्या मार्गी लावण्यासाठी नगर ...
मागील आठ दिवसापासून जिल्ह्याचे तापमान ४५ अंशांच्या वर पोहोचले होते. त्यामुळे दुपारी व रात्री असह्य उकाडा जाणवत होता. दुपारच्या सुमारास कडक ऊन्हामुळे घराबाहेर पडणे कठीण होत होते. मात्र रविवारी सकाळपासूनच थंड वारे वाहण्यास सुरूवात झाली. तसेच ढगाळ वाताव ...
कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला रूग्ण हृदयरोगाने आजारी होता. तो काही दिवस उपचारासाठी चंद्रपूर येथील खासगी दवाखाण्यात गेला होता. मात्र त्रास कमी न झाल्याने ई-पास काढून तो हैदराबाद येथील रूग्णालयात दाखल झाला. त्याच ठिकाणी त्याला ताप आल्याने त्याची कोरोन ...
महामंडळाच्या आरमोरी येथील उप्रप्रादेशिक कार्यालयांतर्गत विहिरगाव येथे आविका संस्थेतर्फे आधारभूत खरेदी केंद्रावर खरीप हंगामात धानाची खरेदी करण्यात आली. मात्र धान खरेदीच्या व्यवहारात झालेल्या चुकांमुळे येथील व्यवस्थापकाकडून केंद्राचा भार काढून घेण्यात ...
आरमोरी शहरातील बर्डी येथील रेशमा विनोद साखरे हिच्या घराची ३० मे रोजी तपासणी केली असता, तिच्या घरी सात लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. ३० मे रोजीच ठाणेगाव येथील किसन मादगू मेश्राम याच्या घरून १० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. या दारूची किंमत दोन हजार र ...
शेतातील केरकचरा, मातीकाम, वखरणी आदी कामे शेतकरी सध्या करीत आहेत. पावसाचे रोहणी नक्षत्राचे पहिले चरण सुरू आहे. रोहिणीच्या पावसानंतर शेतजमिनीत ओलावा आल्यावर शेतकरी धानाचे पºहे टाकत असतात. शेतकऱ्यांना गतवर्षी पावसाच्या हुलकावणीला तोंड द्यावे लागले. ...
२७ मे रोजीच्या रात्री शहरातील दोन संशयीत रूग्णांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली. रूग्ण राहत असलेल्या येथील आंबेडकर वॉर्डाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. सदर प्रतिबंधित क्षेत्रात इतर लोकांना कोरोनाच ...
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळल्यापासून प्रशासन सावध झाले आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाºया प्रत्येक नागरिकाला १४ दिवस क्वॉरंटाईन राहणे बंधनकारक केले आहे. यासाठी प्रशासनाने वसतिगृह, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती अधिग्रहीत केल्या आहेत. प्रशासना ...
आलापल्ली ते सिरोंचापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे उखडून गेला आहे. या मार्गावरील खड्डे पाहिल्यानंतर रस्ता कमी आणि खड्डेच जास्त झाल्यामुळे वाहनचालकांना वाहने नेताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या आधी हा रस्ता दुरूस्त होईल ...
अहेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी हे काम आटोपले आहे. तेंदूपत्ता संकलनाचे काम झाल्यावर तेंदूपुडे पलटविणे, त्याची योग्यरित्या मांडणी करणे, तसेच त्यावर पाण्याचा वापर करणे आदी कामे करावी लागतात. ...